जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:01 IST2017-08-16T22:01:28+5:302017-08-16T22:01:46+5:30

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

Governance, Administration for the development of the people | जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

ठळक मुद्देपालकमंत्री : शासन योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा, तीन लाखांवर शेतकºयांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी केंद्र्र आणि राज्य सरकार कार्य करीत आहे. हे सरकार माझं आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांची प्रगती पालकमंत्र्यांनी सांगितली. कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख १४ हजार शेतकºयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषिपंप विद्युत जोडणी, मागेल त्याला शेततळे आदी योजनांची प्रगती त्यांनी सांगितली. जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित अभ्यासिका होत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या घरकुलासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅकसाठी निधी मंजूर झाला. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादनाचा शेतकºयांना थेट खरेदीने मोबदला दिला जात आहे. १८५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, एसपींचा सत्कार
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. पोलिस उपनिरीक्षक सुरज बोंडे, यवतमाळच्या प्रथम महिला ठाणेदार शीतल मालटे, शिष्यवृत्तीत जिल्ह्यातून प्रथम आलेला अरमान शेंडे, पोलीस पाटील अशोक भोयर यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले.

Web Title: Governance, Administration for the development of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.