गोखी मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा खून

By Admin | Updated: December 29, 2014 23:51 IST2014-12-29T23:51:35+5:302014-12-29T23:51:35+5:30

यवतमाळ-दारव्हा मार्गावरील गोखी नदीच्या तीरावर असलेल्या मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

Gokhi Maruti temple priest's blood | गोखी मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा खून

गोखी मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा खून

बोरीअरब : यवतमाळ-दारव्हा मार्गावरील गोखी नदीच्या तीरावर असलेल्या मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. नेमका खून कुणी व कशासाठी केला हे मात्र गुलदस्त्यात आहे.
सदाशिव गोविंदराव डहाके (६०) रा. काठोडा ता. आर्णी असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. गेल्या चार वर्षांपासून दारव्हा तालुक्यातील कामठवाडा-चाणी गावानजीक असलेल्या गोखी मरुपती मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. सदाशिवला पुजारी म्हणून कोणतेही मानधन मिळत नव्हते. सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान चाणी येथील उपसरपंच श्रावण राठोड व सुधाकर भोयर दर्शनासाठी गेले. मात्र त्यांना पुजारी दिसला नाही. त्यामुळे त्यांनी मंदिरा शेजारील असलेल्या पुजाऱ्याच्या निवासस्थानाकडे जाऊन जोराने आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आतमध्ये जाऊन बघितले असता. पुजारी सदाशिव डहाके खाटेवर उलटा पडून होता आणि त्याच्या अंगावर गादी झाकलेली होती. या घटनेची माहिती तत्काळ लाडखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
पुजारी सदाशिवच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. डोक्यावर मोठा खोल खड्डा पडला होता. तसेच डोळ्याजवळ जबर मार होता. खाटेवरच एक लाकडी दांडाही आढळून आला. तसेच पुजाऱ्याची आलमारी फोडून त्यातील कागदपत्र अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान माग दाखविण्यात अपयशी ठरले. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेन एकच खळबळ उडाली आहे.(वार्ताहर)

Web Title: Gokhi Maruti temple priest's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.