शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दहेली गावकऱ्यांसाठी शेळ्या बनल्या एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:00 PM

खेड्यातील बाया-माणसांना ऐन गरजेच्यावेळी बरेचदा पैसा उपलब्ध होत नाही. मात्र दहेली गावातील महिलांनी एक-एक पैसा जोडून शेळी पालनाचा व्यवसाय मोठा केला. या व्यवसायातून आता दहेली गावकऱ्यांना हवा तेव्हा पैसा उपलब्ध होऊ लागला आहे.

ठळक मुद्देउद्यमी महिला । कर्ज घेण्याची गरजच नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खेड्यातील बाया-माणसांना ऐन गरजेच्यावेळी बरेचदा पैसा उपलब्ध होत नाही. मात्र दहेली गावातील महिलांनी एक-एक पैसा जोडून शेळी पालनाचा व्यवसाय मोठा केला. या व्यवसायातून आता दहेली गावकऱ्यांना हवा तेव्हा पैसा उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे शेळ्या म्हणजे आमच्या खेड्यातील एटीएमच आहे, अशी भावना गावातील महिलांनी व्यक्त केली.बचत गटाच्या चळवळीने यवतमाळ तालुक्यातील दहेली गावात हे परिवर्तन घडविले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून येथे शेळी पालनाचा व्यवसाय सुरू झाला. आज प्रत्येक घरात शेळ्या दिसतात. गावाची लोकसंख्या केवळ १२०० आहे. तर शेळ्यांची संख्या मात्र २२०० आहे. सुरुवातीला शेळ्यांच्या जगण्याचे प्रमाण फारच कमी होते. मात्र या पशुसखींनी गावातच बकºयांच्या दुर्धर आजारावर उपचार सुरू केले आहे. त्यामुळे आज गावकºयांच्या लोकसंख्येपेक्षा गावातील शेळ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. शेळ्या विकून कुणी मुलीचे लग्न केले, कुणी आजारपणात उपचाराचा खर्च भागविला. काहींनी आपल्या मुलांना व्यापार सुरू करून दिला. शिवाय बकरीचे दूध, लेंड्या यामुळे शेतजमीनही सुपिक झाली आहे. शेळ्या विकून अडचण भागविणे सर्वांना शक्य झाले आहे.भिंती केल्या बोलक्याशेळी पालन नफ्याचा व्यवसाय असला तरी त्यांचे पालन पोषण अवघड आहे. स्वच्छ गोठा, चारा, पाणी, लसीकरण या गोष्टींवर भर द्यावा लागतो. दहेली गावकºयांनी शेळी पालनाला बळ देण्यासाठी गावातील भिंतींवर प्रबोधनपर म्हणी लिहून भिंती बोलक्या केल्या. ‘गरिबा घरची गाय’, ‘लसीकरण करा, आजार पळवा’ अशी म्हणी जागोजागी लिहिल्या आहेत. शेळ्यांवर गावातच उपचार करण्यासाठी वंदना भोंग यांना पशुसखी, शालिनी देठे यांना सहयोगिनी, सुनंदा मानकर यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.शेळी पालनाबाबत दर महिन्याला बैठक होते. शेळ्यांमुळे आर्थिक अडचणी जाणवत नाही. पैशासाठी सावकाराकडे जाण्याची गरज उरली नाही. महिला सक्षम झाल्या.- वंदना भोंग, पशुसखी दहेली.

टॅग्स :atmएटीएम