शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

घाटंजीत स्वच्छता अभियान बनले चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:38 AM

शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवण्यासाठी येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी हाक दिली अन् त्या हाकेला प्रतिसाद मिळून लोक हातात फावडे, टोपले घेऊन गल्लीबोळात रस्त्यावर, ......

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : नागरिक, विद्यार्थ्यांचे दररोज श्रमदान, शहर सुंदर बनविण्याचा संकल्प

ऑनलाईन लोकमतघाटंजी : शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवण्यासाठी येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी हाक दिली अन् त्या हाकेला प्रतिसाद मिळून लोक हातात फावडे, टोपले घेऊन गल्लीबोळात रस्त्यावर, वार्डावार्डात जेथे कचरा दिसेल, तेथे पोहोचून सकाळचा आपला एक तासाचा वेळ देऊन श्रमदान करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नित्यश्रम सुरू आहे. हे पाहून स्वच्छता अभियान घाटंजीत लोकचळवळ बनली आहे.या स्वच्छता अभियानात नगरसेवक, नागरिक, समर्थ विद्यालय, समर्थ कर्णबधिर शाळा, एसपीएम विद्यालय, नगरपालिका शाळा, त्यांचे शिक्षक, विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणे शहर स्वच्छ होत आहे. नालीतील साचलेला गाळ, घाण काढल्याने संबंधित परिसर दुर्गंधीमुक्त होत आहे. ही लोकचळवळीची ताकद आहे. श्रमदानाची किमया आहे. हे सर्व पाहून नगराध्यक्ष नयना ठाकूर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, मुख्याधिकारी महेश वाघमोडे भारावून गेले आहे.पहिल्या टप्प्यात गाव स्वच्छ करणे, दुसऱ्या टप्प्यात मोकळ्या जागेचा वापर मुलांना खेळण्यासाठी, झाडे लावण्यासाठी, तिसऱ्या टप्प्यात पाणी संवर्धनाची कामे सर्वांच्या सहकार्याने करणे आदी बाबीचे नियोजन आहे. यामुळे शहराचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर रूप प्राप्त होण्याची शक्यता आहे. नागरिक, पालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, वन विभाग या चळवळीत हिरीरीने सहभागी होत आहे.