घाटंजीत वीज तंत्रज्ञाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:42 IST2021-04-24T04:42:49+5:302021-04-24T04:42:49+5:30

घाटंजी : कोरोनाच्या संकट काळात ग्राहक सेवा व वसुलीचे कार्य उत्कृष्टपणे केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने तंत्रज्ञाचा ...

Ghatanji power technician felicitated | घाटंजीत वीज तंत्रज्ञाचा सत्कार

घाटंजीत वीज तंत्रज्ञाचा सत्कार

घाटंजी : कोरोनाच्या संकट काळात ग्राहक सेवा व वसुलीचे कार्य उत्कृष्टपणे केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने तंत्रज्ञाचा सत्कार करण्यात आला.

येथील महावितरणच्या उपविभागात तंत्रज्ञ म्हणून राजेश गुणवंतराव भोयर कार्यरत आहेत. त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राजेश भोयर तालुक्यातील कुऱ्हाड येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे मुरली, बेलोरा, करमना, कोंडजई, दत्तापूर व लव्हाना आदी गावे येतात. त्यांनी या गावात उत्कृष्ट सेवा देत व वसुलीचे प्रमाण वाढविले.

सहाय्यक अभियंता ताई बावनकर यांच्या हस्ते भोयर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य तंत्रज्ञ पी. एल. रोहणकर, प्रधान तंत्रज्ञ एन. वाय. शेख, वरिष्ठ तंत्रज्ञ रोशन वनकर, भाऊ मेश्राम, प्रतीक रब्बलवार, दिलीप रुद्रावार आदी उपस्थित होते.

Web Title: Ghatanji power technician felicitated