कुंभार समाजाच्यावतीने विजय दर्डा यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:44 IST2017-11-29T23:43:30+5:302017-11-29T23:44:30+5:30

कुंभार समाज बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांचा ‘कुंभश्री’ दिवाळी अंक आणि रुद्राक्षाचे रोपटे देऊन येथील ‘प्रेरणास्थळ’ येथे गौरव करण्यात आला.

Gaurav of Vijay Darda on behalf of Kumbhar Samaj | कुंभार समाजाच्यावतीने विजय दर्डा यांचा गौरव

कुंभार समाजाच्यावतीने विजय दर्डा यांचा गौरव

ठळक मुद्देलोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांचा ‘कुंभश्री’ दिवाळी अंक आणि रुद्राक्षाचे रोपटे देऊन येथील ‘प्रेरणास्थळ’ येथे गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कुंभार समाज बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांचा ‘कुंभश्री’ दिवाळी अंक आणि रुद्राक्षाचे रोपटे देऊन येथील ‘प्रेरणास्थळ’ येथे गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित आदरांजली सभेत विजय दर्डा यांचा गौरव करण्यात आला. कुंभार समाजाचे अध्यक्ष आणि कुंभश्री विदर्भ विभाग प्रमुख के.एन.मोरे यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटर-इन-चीफ माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Gaurav of Vijay Darda on behalf of Kumbhar Samaj