शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांच्या बनावट नाेटा बनविणारी टाेळी जेरबंद; एलसीबीने केले पाच जणांना अटक

By सुरेंद्र राऊत | Updated: June 5, 2025 17:00 IST

Yavatmal : पुसद शहरात जप्त केले एक लाख ९१ हजार

सुरेंद्र राऊतयवतमाळ : पुसद शहरात चलनामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नाेटा वापरल्या जात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पाेलिस पथकाने पाळत ठेवून बनावट नाेटा तयार करणाऱ्या टाेळील अटक केली. त्याच्या  जवळून एक लाख ९१ हजार रुपयांच्या चलनी नाेटा आणि नाेटा बनविण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरूवारी सकाळी करण्यात आली.  

नवीन पुसद परिसरात सोनू पाटील यांच्याकडे किरायाच्या खाेली राजकुमार पारधी राहत हाेता. त्याचेकडे काही संशयीत इसम आलेले असून ते ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोट तयार करीत आहे. अशी गोपनिय माहीती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर एलसीबी पथकाने साेनू पाटील याच्या घराच्या चारही बानूने सापळा लावला. त्यांनतर एका संशयीताला ताब्यात घेतले, त्याचे नाव राजकुमार श्रावन पारधी रा.सावळी ता.मानोरा जि. वाशिम असे आहे. ताे भाडयाने राहत असलेल्या घरातील बेडरुम मध्ये तीनजण गोल रिंगन करून ५०० रुपयांच्या नोटा, नोटांचे आकारचे कोऱ्या कागदाचे बंडल्लख सहा वेगवेगळ्या कंपनीच्या केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटांच्या आकाराचे काळपट कागद असे साहित्य हाती लागले. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण ११७ नाेटा जप्त केल्या.  राजकुमार पारधी, तुकाराम रामाजी गुहाडे रा.हर्षी ता. पुसद, भाऊसाहेब आनंदराव पतंगे रा. काेंढूर ता.कळमनुरी नि. हिंगोली, रामदास किसन भरकाटे रा. डोणवाडा ता.वसमत जि. हिंगोली, पंडीत भालेराव रा. शिवणी ता. कळमनुरी जि. हिंगाेली यांना ताब्या घेतले.  या आराेपी विराेधात पुसद शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पाेलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे., एलसीबी प्रमुख सतीश चवरे,यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गजानन गजभारे, उपनिरीक्षक शारद लोहकरे,जमादार मुन्ना आडे, संतोष भोरगे, सुभाष जाधव, कुणाल मुंडाेकार,रमेश राठोड, सुनिल पंडागळे, रविंद्र श्रीरामे,राजेश जाधव यांनी केली.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी