कॉंग्रेसच्या नगरसेवकांची अशीही गांधीगिरी
By Admin | Updated: June 26, 2014 23:32 IST2014-06-26T23:32:59+5:302014-06-26T23:32:59+5:30
नगरपरिषदेच्या बेजबाबदार धोरणाचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून अनेक वार्डात मागील चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहे. या प्रकारामुळे वार्डामध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असते.

कॉंग्रेसच्या नगरसेवकांची अशीही गांधीगिरी
पुसद : नगरपरिषदेच्या बेजबाबदार धोरणाचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून अनेक वार्डात मागील चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहे. या प्रकारामुळे वार्डामध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असते. या बाबीचा निषेध करीत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवार २६ जून रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर कंदील लावून गांधीगिरी केली.
पथदिव्याच्या समस्येच्या संदर्भात कॉंग्रेसच्या नगरसेवकांना गांधीगिरीसह ठिय्या आंदोलन करावे लागले.
आंदोलनामध्ये कॉंग्रेसचे गटनेते डॉ.महंमद नदीम, जकी अनवर, लक्ष्मण वाघमोडे, अशोक उंटवाल, अजय पुरोहित, समद कुरेशी, निता खडसे, मीरा साहू, शुभांगिनी चिद्दरवार, नजमुन्नीसा, जोहराबी, महेश खडसे, अभिजित चिद्दरवार, शेख कय्यूम, राजू साहू आदींनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)