जेतवनमध्ये अस्वलाचा मुक्तसंचार, नागरिकांनी केले चित्रीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:00 PM2021-06-10T21:00:55+5:302021-06-10T21:01:29+5:30

वन विभागाची यंत्रणा सुस्त

Free movement of bears in Jetwan, filmed by citizens in yavatmal | जेतवनमध्ये अस्वलाचा मुक्तसंचार, नागरिकांनी केले चित्रीकरण 

जेतवनमध्ये अस्वलाचा मुक्तसंचार, नागरिकांनी केले चित्रीकरण 

Next

हिवरी  (जि. यवतमाळ) : जंगलात अस्वलाची भेट होऊ नये अशी म्हण प्रचलित आहे. अस्वल हे वाघापेक्षाही घातक व आक्रमक आहे. ते कधीही हल्ला करून समोर दिसणाऱ्याचा फडशा पाडते. यवतमाळ शहरानजीकच्या जाम टेकडी परिसरासह हिवरी वनपरिक्षेत्रात सातत्याने अस्वल दिसत आहे. आर्णी मार्गावरील जेतवन येथे बुधवारी भरपावसात अस्वलाने आश्रय घेतला. नागरिकांनी त्याचा व्हिडीओ काढत चित्रीकरण केलं आहे.

अस्वलासारखा प्राणी नागरी वस्तीच्या आसपास गेल्या काही आठवड्यांपासून संचार करीत आहे. ही बाब हिवरी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. अस्वल दिवसाढवळ्या वावरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. अस्वलाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. वन विभागाने तत्काळ याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Free movement of bears in Jetwan, filmed by citizens in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.