शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे आमिष देऊन शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: June 2, 2016 00:08 IST

पीक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आमणी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.

आमणीचे शेतकरी : प्रत्येकी पाच हजार रुपये घेतलेआर्णी : पीक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आमणी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ३७ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेण्यात आले. शिरोली (ता. घाटंजी) येथील युवकाने हा प्रकार केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी आर्णी पोलिसात केली. नामांकित कंपनीचा एजंट असल्याचे सांगत शिरोली येथील एका तरुणाने आमणी गावातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज काढून देण्याचे आमिष दिले. कर्जासाठी पाच हजार रुपये भरावे लागतात, असे सांगून त्याने ३७ शेतकऱ्यांकडून ही रक्कम उकळली. बराच कालावधी लोटूनही या तरुणाचा पत्ता नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, तो २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. विविध माध्यमातून त्याच्याशी काही लोकांचा संपर्क झाला. तेव्हाही त्याने कर्ज मिळवून दिले जाईल, असेच सांगितले. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असतानाही पीक कर्ज उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीवर चंपत गुणाजी आडे, राजू बाळकृष्ण आडे, नामदेव गजभार, बळीराम राठोड, गोकुळ बरडे, संजय राठोड, जितेश चव्हाण, सेवादास चव्हाण, दिलीप बरडे, विजय चव्हाण आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पेरणीच्या तोंडावर काही लोक विविध कंपन्यांची नावे सांगत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवित आहे. अशा लोकांपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. खात्री करुनच आर्थिक व्यवहार करावा, अशी विनंती आमणी येथील जितेश चव्हाण यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)