चारचाकीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगी फाट्याजवळील घटना
By विलास गावंडे | Updated: May 1, 2023 18:17 IST2023-05-01T18:16:59+5:302023-05-01T18:17:06+5:30
धडकेत दुचाकीस्वार नयनलाल गुलाबराव काळे (वय ५२, रा दहेगाव) हे गंभीर जखमी झाले.

चारचाकीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगी फाट्याजवळील घटना
वडकी (यवतमाळ) : राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग सातवरील मंगी फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. ही दोन्ही वाहने दहेगावकडून वडकीकडे जात होती. त्यातच एमएच २९ क्यु २७९२ दुचाकीला एमएच २९ आर ६०९८ या चारचाकी ओमनी वाहनाने मागून जबर धडक दिली.
धडकेत दुचाकीस्वार नयनलाल गुलाबराव काळे (वय ५२, रा दहेगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी जमलेला नागरीकांनी त्यांना उपचारासाठी दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्नवाहिकेमधून करंजी येथे प्राथमिक रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दुसरीकडे, अपघातातील चारचाकी वाहन ओमनी हे धडक दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गवरुन २० ते ३० फूट खाली उतरले. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी पोहचले पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.