झोपडीत ट्रक शिरल्याने पती-पत्नीसह चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:57 IST2018-02-11T21:57:25+5:302018-02-11T21:57:47+5:30

विटभट्टीवर काम करणाऱ्यां मजुराच्या झोपडीत ट्रक शिरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी दुपारी २ वाजता घडली.

Four seriously injured husband and wife were arrested in the hut | झोपडीत ट्रक शिरल्याने पती-पत्नीसह चार गंभीर

झोपडीत ट्रक शिरल्याने पती-पत्नीसह चार गंभीर

ठळक मुद्देदारव्हाची घटना : ट्रकचालक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : विटभट्टीवर काम करणाऱ्यां मजुराच्या झोपडीत ट्रक शिरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी दुपारी २ वाजता घडली. या अपघातात संपूर्ण झोपडी उद्ध्वस्त झाली.
प्रदीप सदाशिव मनवर (४५), पत्नी सुनीता प्रदीप मनवर (४०), आई गुंफाबाई सदाशिव मनवर (६०) आणि मलुगा अर्जून प्रदीप मनवर (१८) अशी जखमींची नावे आहे. त्यांना दारव्हा येथे उपचार करून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. येथील नेर मार्गावरील रेल्वे स्टेशन परिसरात विटभट्टी आहे. या विटभट्टीवर रविवारी एक ट्रक कोळसा घेवून आला. कोळसा खाली करून परत जाताना चालकाचे नियंत्रण गेल्याने विटभट्टी शेजारी असलेल्या झोपडीत ट्रक (एम.एच.२६/एच.९२७१) शिरला. त्यावेळी या झोपडीत मनवर परिवार होता. अचानक ट्रक शिरल्याने संपूर्ण झोपडी उद्ध्वस्त झाली. त्यात कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले. विटभट्टीवरील मजुरांनी त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत दारव्हाच्या रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला रवाना केले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Four seriously injured husband and wife were arrested in the hut

टॅग्स :Accidentअपघात