शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई

By सुरेंद्र राऊत | Updated: September 13, 2024 21:51 IST

तब्बल एक महिन्यानंतर मिळाला कारवाईचा मुहूर्त...

यवतमाळ : बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ काेटींचा अपहार झाला आहे. यामध्ये २०६ जणांवर आराेप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात सहकार विभागाने नियुक्त केलेल्या विशेष लेखा परिक्षक यांच्या तक्रारीवरून १३ ऑगस्ट राेजी २०६ जणांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. यानंतर तब्बल महिनाभराने पाेलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी पहाटेच चार आराेपींना अटक केली. बॅकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन, विलास सुधाकर माहजन या दाम्पत्यासह इतर चाैघांचा समावेश आहे. अपहाराचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीने शुक्रवारी पहाटे अचानक माेहीम हाती घेतली. राजकीय आश्रयामुळे अटक हाेणार नाही, या अर्विभावात असलेल्या आराेपींना माेठा धक्का बसला. एसआयटी पथकाने सर्व प्रथम राजन्ना अपार्टमेंट येथून महाजन दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळेतच सत्यनारायण ले-आऊट येथून ॲड. वसंत माेहर्लीकर, नेर येथील नवलकिशाेर रमेशचंद्र मालाणी यांना अटक केली. या चाैघांवरही विशेष लेखा परिक्षकांनी गंभीर स्वरूपाचे आराेप केले आहेत. बॅंकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना सुजाता महाजन यांनी पती विलास महाजन यांच्यासह जवळच्या नातेवाइकांच्या नावाने माेठ्या रकमेच्या कर्जाची उचल केली आहे.यातून मालमत्ताची खरेदी केल्याचाही आराेप आहे. ही कर्जाऊ रक्कम त्यांनी बॅंकेकडे परत केली नाही. अपहरातील २०६ आराेपींमध्ये महाजन दाम्पत्याचे कृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याने एसआयटीने अटकेच्या कारवाईची सुरुवात त्यांच्यापासून केली आहे. या दाम्पत्याला पहाटे अटक करून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसविण्यात आले हाेते. सायंकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हजर करण्यात आले. या कारवाईबाबत एसआयटी प्रमुख चिलुमुला रजनिकांत यांना विचारणा केली असता, त्यांनी अधिकृत माहिती ही पाेलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडूनच मिळेल असे सांगितले. त्यावरून एसपी चिंता यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी चार आराेपींना अटक झाली असून, त्यांची काेठडी घेण्यात येईल, असे सांगितले. पाेलिस कारवाई हाेताच इतर आराेपी पसार महिला बॅंकेत असलेला गरिबांचा पैसा लुबाडणाऱ्यामध्ये २०६ जणांवर आराेप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही महिनाभरात काेणतीच कारवाई झाली नाही. फाॅरेन्सिक ऑडीटचे कारण पुढे केले जात हाेते. यावरून ठेवीदार संतप्त झाले, त्यांनी बुधवार ४ सप्टेंबर राेजी निवेदन देऊन आंदाेलनाचा इशारा दिला. त्यानंतर पाेलिस ॲक्शन माेडवर आले. एसाआयटीने शुक्रवारी पहाटे चार आराेपींना अटक केल्यानंतर, इतरांचे धाबे दणाणले आहेत. इतर २०२ आराेपी ही माहिती मिळताच गाव साेडून पसार झाले आहे. काहींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर निर्णय झालेला नाही.

टॅग्स :bankबँकPoliceपोलिस