उमरखेड हत्याकांडात आरोपीला मदत करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:00 AM2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:02+5:30

हत्येच्या कारणाचा शोध घेत असताना ४ मे २०१९ रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा धागा पकडून तपास सुरू झाला. त्यावरून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अबरार (२२)  रा. पुसद याच्यावर लक्ष केंद्रित केले. २०१९ मध्ये शेख ऐफाज याचा भाऊ शेख अरबाज याचा उमरखेड येथे रात्री २ वाजता अपघात झाला होता. तेव्हा डॉ. हनुमंत धर्मकारे यांनी उपचारात दुर्लक्ष केल्याने भावाचा मृत्यू झाला असा आरोप करून शेख ऐफाज याने वाद घातला, डॉ. धर्मकारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Four arrested for helping accused in Umarkhed massacre | उमरखेड हत्याकांडात आरोपीला मदत करणाऱ्या चौघांना अटक

उमरखेड हत्याकांडात आरोपीला मदत करणाऱ्या चौघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर डॉ. हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेसाठी जिल्हाभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले. ग्रामीण आरोग्य सुविधा प्रभावित झाली. या दबावात पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू ठेवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या वर्णनाच्या युवकाचा माग काढणे सुरू केले. या हत्याकांडात मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या चौघांना ढाणकी येथून पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी उमरखेड येथे पत्रपरिषदेत दिली. 
डॉ. हनुमंत संताराम धर्मकारे यांची हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली, यावरच पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. त्यात कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक वाद ही कारणे नसल्याचे पुढे आले. हत्येच्या कारणाचा शोध घेत असताना ४ मे २०१९ रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा धागा पकडून तपास सुरू झाला. त्यावरून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अबरार (२२)  रा. पुसद याच्यावर लक्ष केंद्रित केले. २०१९ मध्ये शेख ऐफाज याचा भाऊ शेख अरबाज याचा उमरखेड येथे रात्री २ वाजता अपघात झाला होता. तेव्हा डॉ. हनुमंत धर्मकारे यांनी उपचारात दुर्लक्ष केल्याने भावाचा मृत्यू झाला असा आरोप करून शेख ऐफाज याने वाद घातला, डॉ. धर्मकारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचाच वचपा काढण्यासाठी पाळत ठेवून मुख्य आरोपी शेख ऐफाज याने ११ जानेवारी २०२२ ला ४.४५ वाजता गोळ्या झाडून डॉ. धर्मकारे यांची हत्या केली, असे पोलीस तपासातून उघड झाले आहे. डॉक्टरवर गोळीबार करून आरोपी शेख ऐफाज हा ढाणकी येथे पसार झाला.  त्याला आरोपी सय्यद तौसीफ सय्यद खलील (३५), सय्यद मुश्ताक सय्यद खलील (३२), मौहसीन शेख कय्युम (३४), शेख शाहरुख शेख आलम (२७) सर्व रा. ढाणकी यांनी मदत केली. या चौघांच्या मदतीने शेख ऐफाज हा पसार झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून शेख ऐफाज याला पसार करण्यासाठी वापरलेले वाहन (एमएच-४-डीएन-६२६३) जप्त केले. या गुन्ह्यात पोलिसांनी कलम १०९, १२० ब, २१२ भारतीय हत्यार कायदा, ॲट्राॅसिटीचे कलम ३ (२) व्हीची वाढ केली. 

पसार आरोपीच्या शोधासाठी दहा पथके
- मुख्य आरोपीच्या शोधासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहे. त्यात उमरखेड, बिटरगाव,पोफाळी, दराटी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा ४८ तासांत छडा लावल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक ए. के. धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी, उमरखेड ठाणेदार अमोल माळवे, बिटरगाव ठाणेदार, दराटी ठाणेदार, सायबर सेल प्रमुख अमोल पुरी यांच्यासह अंमलदार व इतर कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस, सी नोट, प्लस जीएसटी जाहीर केले आहे.

 

Web Title: Four arrested for helping accused in Umarkhed massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.