शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वणीजवळ सापडले विशालकाय डायनासोरचे जीवाश्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:39 IST

यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच नोंद; सहा कोटी वर्षांपूर्वी प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात गडप झाले सजीव

वणी (यवतमाळ) : तालुक्यातील वीरकुंड गावाजवळ सहा कोटी वर्षांपूर्वीच्या लेट क्रिटाशियस काळातील विशालकाय डायनोसोर या प्राण्याचे जीवाश्म सापडले असल्याचा दावा पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.

मागील काही वर्षांपासून प्रा. सुरेश चोपणे हे या परिसरात संशोधन करीत आहेत. या संशोधनादरम्यान, दोन वर्षांपूर्वी डायनाेसोरच्या पायाचे एक अश्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसोर जीवाश्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून अभ्यास म्हणून सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव व झरी तालुक्यात ६ कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्याची जीवाश्मे, तर १५० कोटी वर्षांपूर्वीची स्ट्रोमॅटोलाइटचे जीवाश्म शोधून काढले आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात २५ हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीन अवजारेसुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तिगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी पाहण्यासाठी ठेवली आहेत.

वणी तालुक्यातील बोर्डा-वीरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोइक या १५० कोटी वर्षांदरम्यानच्या काळातील पैनगंगा ग्रुपचा चुनखडक असून, त्या काळात इथे समुद्र होता. जुरासिक काळात इथे विशालकाय अशा डायनासोर प्राण्यांचा विकास झाला; परंतु ६ कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसोर मारले गेले. इथे बेसाॅल्ट या अग्निजन्य खडकाच्या रूपाने ते पुरावे आजही पाहायला मिळतात; परंतु अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.

वीरकुंड गावाजवळ ५० वर्षांपूर्वी डायनोसोरचा अश्मीभूत सांगाडा असावा; परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे बांधण्यासाठी वापरला. हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनासोरची हाडेसुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. त्यामुळे येथे पुन्हा जीवाश्म आढळले नाही. ४० वर्षांपूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे याना एक जीवाश्मीकृत हाड सापडले. जीवाश्मांचा आकार, प्रकारावरून, स्थळावरून, काळावरून आणि भूशास्त्र विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार हे जीवाश्म डायनासोरचेच आहे, असा विश्वास चोपणे यांनी व्यक्त केला. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खूप जीवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.

चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी, मुकुटबन हा परिसर जीवाश्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृद्ध आहे. या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनासोरची जीवाश्मे आढळू शकतात. त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्व्हे आणि संशोधन होणे गरजेचे आहे.

- प्रा सुरेश चोपणे, संशोधक

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणYavatmalयवतमाळ