माजी खासदार विजय दर्डा दसºयाला यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:49 IST2017-09-29T23:49:25+5:302017-09-29T23:49:36+5:30
शहर आणि जिल्ह्याच्या विकासकामांचा ध्यास घेतलेले माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा दसºयाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात आले आहेत.

माजी खासदार विजय दर्डा दसºयाला यवतमाळात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर आणि जिल्ह्याच्या विकासकामांचा ध्यास घेतलेले माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा दसºयाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात आले आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासोबतच ते मित्रपरिवारासह वेळ घालविणार आहेत.
शहरातील उद्योग, रस्ते, रेल्वे अशा मुलभूत विकासकामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्हा प्रशासनासोबत वारंवार समन्वय साधून खासदार दत्तक ग्राम भारी येथील विकासकामांसाठी पुढाकार घेतला आहे. विजयादशमीच्या खास औचित्याने ते यवतमाळ शहरात राहणार आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी असे या दौºयाचे स्वरुप असले तरी यानिमित्ताने विविध विकासकामांवर चर्चा होणार आहे.