वन विभागाच्या कॅमेऱ्यांची चोरी

By Admin | Updated: June 16, 2017 01:45 IST2017-06-16T01:45:53+5:302017-06-16T01:45:53+5:30

वन्यप्राण्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी झरी तालुक्यातील पवनार जंगलामधील बीट क्रमंक २३ मध्ये मॉनिटर कॅमेरे लावण्यात आले होते.

Forest department cameras stolen | वन विभागाच्या कॅमेऱ्यांची चोरी

वन विभागाच्या कॅमेऱ्यांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुकुटबन : वन्यप्राण्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी झरी तालुक्यातील पवनार जंगलामधील बीट क्रमंक २३ मध्ये मॉनिटर कॅमेरे लावण्यात आले होते. हे कॅमेरे वल्हासा (घोडापोड) येथील पाचजणांनी चोरून नेल्याची बाब उजेडात आली असून त्यांच्याविरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कॅमेऱ्याची किंमत ४० हजार रूपये आहे.
महादू वासुदेव मडावी (२५), मारोती शालिक टेकाम (२५), भास्कर वासुदेव मडावी (२७), आनंदराव आत्राम (३०) व रामकिसन बापूराव आत्राम (३५) अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्वजण प्राण्यांची शिकार करण्यासाठी भाले, कुऱ्हाड व इतर शस्त्र घेऊन फिरत होते. त्यादरम्यान त्यांच्या अंगावर कॅमेराचा फ्लॅश पडल्यामुळे ते भांबावून गेले. आपण कॅमेरात कैैद झाल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच, या चोरट्यांनी कॅमेरेच चोरून नेले. ही बाब दुसऱ्या दिवशी लक्षात आली व चोरटे वल्हासाचे असल्याचे चौैकशीत उघड झाले. याप्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी आर.आर.काकडे यांनी मुकुटबन ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून या पाच जणांविरूद्ध भादंवि कलम ३७९, ४२७ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल न्याहारे, जमादार मोहन कुडमेथे करीत आहे.

Web Title: Forest department cameras stolen