शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

तलावफैलात टँकरची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:10 IST

शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अरूंद रस्त्यांमुळे टँकर आतपर्यंत शिरतच नाही. अशा ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्री मैलोन्मैल पायपीट करावी लागते.

ठळक मुद्देलोहाऱ्यातून आणावे लागते पाणीचारच हापशा जिवंत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अरूंद रस्त्यांमुळे टँकर आतपर्यंत शिरतच नाही. अशा ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्री मैलोन्मैल पायपीट करावी लागते. यावर मात करण्यासाठी तलाव फैलातील नागरिकांनी लोकवर्गणी करून विहिरीतला गाळ उपसला. पण हे पाणी अपुरे पडत आहे. विहिरीचे खोलीकरण केल्यास मुबलक पाणी लागेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाने विलंब लावला. यामुळे तलाव फैलातील काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील महिला दिवसभर काम करून पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार आहे.तलाव फैलमधील पॉवर हाऊसमध्ये २३ दिवसानंतर नळ आले. या नळाचे पाणी परिसरातील अर्ध्या भागाला मिळालेच नाही. प्राधिकरणाची पाईपलाईन चोकअप झाल्याने हे पाणी अनेकांच्या घरापर्यंत पोहोचले नाही. या भागातील नागरिकांनी नगरसेवक आणि जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली. पण चोकअप निघाला नाही. यामुळे या भागात अजूनही पाणी आले नाही, असे मत महेश ठाकरे यांनी व्यक्त केले.या भागात हापशीला सबमर्शिबल पंप लावून शौचालयात नेले आहे. या टंचाई काळामध्ये नागरिकासाठी हापशी मोकळी केली तर, पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्या आणि या हापशीवरून नळाचे पॉर्इंट या भागात दिले, तर पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटेल, असे मत लता राऊत यांनी व्यक्त केले.तलाव फैलातील काही भाग आणि गवळीपुरामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागातील अरूंद रस्त्यामध्ये टँकर शिरत नाही. यामुळे आम्हाला टँकरचे पाणी मिळाले नाही. अरूंद रस्त्यांच्या वस्तीमध्ये विहीर आहे. या विहिरीचे पाणी खोल गेले आहे. यामुळे नागरिकांनी लोकवर्गणी करून विहिरीतला गाळ काढला. नगरपरिषदेने या विहिरीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला. त्याला खोल केल्यास पाणीटंचाई संपेल. ब्लिचिंग टाकल्यास विहिरीतील पाणी स्वच्छ होईल, असे शोभा मस्के, जया विंचूरकर, प्रज्ञा दांडेकर, रेखा जीवतोडे, पुष्पा मस्के म्हणाल्या.या भागातील नागरिकांना पंचशील चौक, छोटी गुजरी, लोखंडी पुल, जीनमधून पाणी आणावे लागते. दिवसभर काम करून महिला गुंडाने पाणी भरतात. तर काही जण रात्रीला रिक्षाच्या माध्यमातून पाणी आणतात. अनेकांना पाण्यासाठी कामावर जाता येत नाही. यातून अनेकांची रोजमजुरी बुडाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पुष्पा माने, मनिषा बानोरे, यांनी केला.पाणीटंचाई नसतानाही या भागातील नागरिकांना पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागते. नळाच्या प्रतीक्षेत रात्र जागून काढावी लागते. मोटर लावल्याशिवाय वर पाणी चढत नाही. वारंवार तक्रारी करूनही हा प्रश्न निकाली काढला नाही. आता त्यांना भीषण पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.लोहाऱ्यातून आणावे लागते पाणीपाण्याची तजवीज करताना, नागरिकांनी लोहाºयाकडे धाव घेतली आहे. या ठिकाणावरून खासगी आॅटोरिक्षा आणि अ‍ॅपेमध्ये पाणी भरून आणावे लागत आहे. अनेकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाक्या नाही. तर अनेकांना पाण्याच्या टाक्या भाड्याने घ्याव्या लागल्या आहेत.चारच हापशा जिवंतया भागात पाण्याच्या ९ हापशांपैकी चार हापशांनाच पाणी आहे. यामुळे नागरिकांना हातपंपावरून पाणी भरण्यासाठी जिवंत स्त्रोतांकडे धाव घ्यावी लागते. यामुळे पाण्याच्या स्त्रोतावर प्रचंड गर्दी उसळत आहे.

टॅग्स :Waterपाणी