फुलसावंगीने केली पाणीटंचाईवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:40 IST2018-05-26T22:40:00+5:302018-05-26T22:40:00+5:30
तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला असताना फुलसावंगी ग्रामपंचायतीने मात्र या पाणी टंचाईवर मात केली आहे. लोकसहभागातून दररोज दीड लाख लिटर पाण्यातून गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे.

फुलसावंगीने केली पाणीटंचाईवर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला असताना फुलसावंगी ग्रामपंचायतीने मात्र या पाणी टंचाईवर मात केली आहे. लोकसहभागातून दररोज दीड लाख लिटर पाण्यातून गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे.
फुलसावंगी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यावर मात करण्यासाठी माजी सरपंच अमर दळवी यांच्या पुढाकारातून सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय योजनेकडे न पाहता स्वत:हून उपाययोजना सुरू केल्या. १४ व्या वित्त आयोगातील २० कोटी रुपये ग्रामपंचायतीत पडून असताना ग्रामपंचायतीने पाणीटंचाईला महत्व दिले. या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून टँकर खरेदी केला असून चौकाचौकात गरजेनुसार नळ सुरू करण्यात आले आहे. एटीएमद्वारे पाण्याची सुविधा करण्यात आली. प्रत्येक शाळेत स्वतंत्रपणे उपाययोजना करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा पुढाकार पाहून अमर दळवी व स्वप्नील नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. पाण्याच्या नियोजनासाठी सरपंच कल्पना नखाते, उपसरपंच नासीर खान बशीर खान, सचिव सुदर्शन शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. आता लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात करण्यात आली आहे.