उच्चदाब वीज वाहिनीच्या स्पर्शाने फ्लेमिंगोंचा मृत्यू े

By Admin | Updated: July 1, 2014 01:42 IST2014-07-01T01:42:37+5:302014-07-01T01:42:37+5:30

फ्लेमिंगो पक्ष्याच्या जोडीचा मृत्यू उच्चदाब वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. दुर्मिळ जातीच्या या पक्ष्यांच्या शवविच्छेदनानंतर हिवरी येथील वनपरिक्षेत्र

Fleming's death by the touch of high-powered power channel | उच्चदाब वीज वाहिनीच्या स्पर्शाने फ्लेमिंगोंचा मृत्यू े

उच्चदाब वीज वाहिनीच्या स्पर्शाने फ्लेमिंगोंचा मृत्यू े

शिवानंद लोहिया - हिवरी
फ्लेमिंगो पक्ष्याच्या जोडीचा मृत्यू उच्चदाब वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. दुर्मिळ जातीच्या या पक्ष्यांच्या शवविच्छेदनानंतर हिवरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यवतमाळ-आर्णी मार्गावरील मांगूळ साखर कारखान्यामागील उमेश सूर्यवंशी यांच्या शेतात रविवारी सकाळी ९ वाजता फ्लेमिंगोची जोडी मृतावस्थेत आढळली होती. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोनही पक्ष्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन यवतमाळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.आर. ईसड आणि डॉ. पी.ए.नागापुरे यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात दोनही पक्ष्यांना विजेचा जबर धक्का बसल्याचे पुढे आले. ज्या शेतात फ्लेमिंगोची जोडी मृतावस्थेत आढळली, तेथून उच्चदाब वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. या तारांचा स्पर्श झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पाऊस नसल्याने दमट वातावरण आहे. तसेच उकाडाही प्रचंड आहे. अशा स्थितीत फ्लेमिंगोची जोडी प्रवासाने थकली असावी आणि हिरवे शेत दिसल्याने त्या ठिकाणी पाण्याच्या शोधात उतरत असताना विजेचा धक्का लागला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा पक्षी जमिनीपासून साधारणत: २५० मीटर उंचावरून उडतो. हिरवे शेत दिसल्याने तो आकृष्ट झाले.
फ्लेमिंगो पक्षावर वनविभागाच्या रोपवाटिकेत सोमवारी दहन करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहिते, वनपाल जी.के. तिडके, वन कामगार मिर्झा, विजय धांदे उपस्थित होते. दुर्मिळ आणि देखण्या पक्षाच्या अकाली मृत्यूने विभागात हळहळ व्यक्त होत आहे.
देखणा फ्लेमिंगो
फ्लेमिंगो हा अतिशय देखणा पक्षी आहे. जगात या पक्ष्याच्या सहा जाती आहेत. त्यातील दोन जाती भारतात आढळतात. ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो या दोन जाती आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातच्या कच्छ भागात हे परदेशी पाहुणे विणीच्या काळात येतात. तेथून ते भारतभर भ्रमण करतात. लेसर फ्लेमिंगो हा दीड ते तीन किलो वजनाचा असतो. तर त्याची उंची ९५ ते १०० सेमी असते. ग्रेटर फ्लेमिंगो हा त्या पेक्षा थोडा मोठा आणि वजनाने अधिक असतो. या पक्ष्याचा रंग पांढरा असून पंख आणि पाय गुलाबी असतात. चोचीवरही गुलाबी छटा असतात. चोच वैशिष्ट्यपूर्ण असून चिखलात भक्ष शोधण्यासाठी तिचा उपयोग होतो. विशेष म्हणजे नर आणि मादी दिसायला सारखीच असते. आयुष्यभरासाठी ते जोडी जमवितात आणि एका वेळी दोन ते तीन अंडी देतात. लेसर फ्लेमिंगो हा विशिष्ट भागात सर्वाधिक आढळतो. तर ग्रेटर फ्लेमिंगो हा सगळीकडे आढळतो. परंतु कमी संख्येत असतो. पाणी आणि दलदलीच्या भागात या पक्षांचे वास्तव्य असते. साधारणत: ४० ते ६० वर्ष या पक्ष्याचे आयुष्य असते. मांगुळजवळ आढळलेली फ्लेमिंगोची जोडी साडेतीन ते पाच वर्षाची असावी, असे पक्षी तज्ज्ञ जयंत अत्रे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात फ्लेमिंगोची कुठेही नोंद नाही. त्यामुळे हे दोन पक्षी कोठून आले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु दिग्रसनजीकच्या अरुणावती प्रकल्पातील पाण्यावर जात असावे, असे सांगितले जाते.

Web Title: Fleming's death by the touch of high-powered power channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.