शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुरुष असे काढले. त्यामुळे काँग्रेसचे विलास रामभाऊ अगलदरे यांची अविरोध निवड झाली.

ठळक मुद्देविलास अगलदरे सभापती : आरक्षण शुद्धीपत्रकानुसार अविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आरक्षणामुळे आर्णी पंचायत समिती सभापती निवडीची लांबलेली निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली. सभापती पदी काँग्रेसचे विलास रामभाऊ अगलदरे यांची अविरोध निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार सभापती पद काँग्रेस व उपसभापती पद शिवसेनेकडे देण्याचे निश्चित झाले होते.यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुरुष असे काढले. त्यामुळे काँग्रेसचे विलास रामभाऊ अगलदरे यांची अविरोध निवड झाली.दरम्यान, आधी काढलेल्या आदिवासी महिला राखीव आरक्षणाला अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव करावे, अशी मागणी भाजपच्या पंचायत समिती सदस्या प्रियतमा अनिल बन्सोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र तसे आरक्षण देता येत नसल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकाºयांनी आदिवासी महिला राखीव ऐवजी आदिवासी राखीव आरक्षण दिले.आर्णी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे चार, शिवसेना दोन व भाजपचे दोन असे संख्याबळ आहे. मंगळवारी झालेल्या सभापती निवडणुकीत भाजपचे सदस्य प्रियतमा अनिल बन्सोड व पपिता संतोष भाकरे अनुपस्थित होते. काँग्रेसच्या सविता भारत राठोड उपस्थित राहू शकल्या नाहीत. सभेला विलास अगलदरे, श्रीकांत वसंतराव राठोड, सूर्यकांत जयस्वाल, अनुपकुमार राजेंद्र जाधव, ज्योती संदीप उपाध्ये हे सदस्य उपस्थित होते. निवड प्रक्रियेला पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार धीरज स्थूल होते.लोणी गणात पंचायत समितीची सत्ताविलास अगलदरे यांच्या माध्यमातून लोणी गणाला सभापती पद मिळाले आहे. आरक्षणाने एकमेव सदस्य पात्र ठरल्याने निवड बिनविरोध झाली. नवनिर्वाचित सभापतींना काँग्रेसचे नेते आरीज बेग, राजू विरखेडे, शिवसेनेचे उपसभापती रवी राठोड, मावळते सभापती सूर्यकांत जयस्वाल यांनी आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती