विनयच्या खुनातील पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:14+5:30
पहिल्या तीन आरोपींची नावे जखमीने फिर्यादीत दिली आहे, तर उर्वरित दोघांचा कौशल्यपूर्णरित्या शोध घेतला. हे सर्व आरोपी पसार होते. त्यांना शहर ठाण्यातील वॉरंट तामील करणाऱ्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच प्रमुख पथक या टोळीच्या मागावर होते. त्यांना आरोपीचा शोध लागला नाही.

विनयच्या खुनातील पाच आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वाघापूर चौकात कुंटनखान्यावरील वादातून विनय राठोड या युवकाचा खून झाला होता. १० डिसेंबर रोजी ही घटना घडली. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला सात आरोपींना अटक केली. आता शहर पोलिसांच्या वॉरंट तामील पथकाने बुधवार, २५ डिसेंबर रोजी पाच आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मात्र अजूनही फरार आहे.
सिनू उर्फ राहुल संजय शिंदे (१९), दाऊ उर्फ प्रसन्ना प्रमोद मेश्राम (१९) दोघेही रा.विदर्भ हाऊसिंग सोसायटी, देवानंद प्रल्हाद कोरवते (२२) रा.सुराणा ले-आऊट, साहील रफिक शेख (१९) रा.गौतमनगर, रहीम मोती सैयद (१९) रा.जामनकरनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पहिल्या तीन आरोपींची नावे जखमीने फिर्यादीत दिली आहे, तर उर्वरित दोघांचा कौशल्यपूर्णरित्या शोध घेतला. हे सर्व आरोपी पसार होते. त्यांना शहर ठाण्यातील वॉरंट तामील करणाऱ्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच प्रमुख पथक या टोळीच्या मागावर होते. त्यांना आरोपीचा शोध लागला नाही. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी शहरातील गुन्हे नियंत्रणाच्यादृष्टीने हद्दीचा विचार न करता तपास सुरू ठेवला. त्यात यश मिळाले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विरू कोल्हे याच्याही अटकेसाठी शहर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच दोन ठाण्याच्या तपासात सांघिक कामगिरी आढळून आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशीष बोरकर, कमलेश भोयर, अमित जाधव, व्यास आदी कर्मचाऱ्यांनी केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्यादृष्टीने या कुख्यात आरोपींना तातडीने अटक होणे गरजेचे होते.