शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

शेतकऱ्यांसाठी मत्स्य विक्री व्यवस्थापनावर भर

By admin | Published: August 03, 2015 2:23 AM

अवर्षणामुळे बाधित भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागातील अंतर्भूत मासळी विक्रीसाठी फिरते वाहन ...

दारव्हा : अवर्षणामुळे बाधित भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागातील अंतर्भूत मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत धोरणात्मक निर्णय झाला असून सदर योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.राष्ट्रीय मत्सकी विकास निगम (एनएफडीबी) मार्फत मासळी विक्री व्यवस्थापन या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येत होते. एनएफडीबीने सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०१५-१६ करिता अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी अनुदानाची रक्कम प्रकल्पाच्या ४० टक्के सर्वसाधारणासाठी व ५० टक्के अनुसूचित जाती/जमातीसाठी अर्थसहाय्याचे निकष ठेवले आहेत. त्यानुसार ६० टक्के राज्य शासन व ४० टक््के एनएफडीबी असे १०० टक्के अर्थसहाय्याने ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार सदर फिरत्या वाहनामध्ये मासे तळणे व शिजविण्यासाठी गॅस व भांडी तसेच साठवणुकीसाठी शीतपेटी वाहनासोबत देण्यात येणार आहे. या योजनेतून विदर्भातील यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ५० गटांना २५० वाहने, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात १० गटांना ५० वाहने तर मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ७५ गटांना ३६० वाहने पुरविण्यात येणार आहेत. अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला बचत गटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. पाच व्यक्तींच्या एका गटात वाहन पुरविण्यात येणार आहे. वाहनाची देखभाल, डिझेल खर्च व ड्रायव्हर याचा भार लाभार्थ्यांवर राहणार आहे. एका गटास १०० टक्के अनुदानीत मासळी विक्रीसाठी फिरते वाहन देण्यात येणार आहे. लाभार्थी वयोमर्यादा १८ ते ६० अशी राहणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाचही लाभार्थींच्या नावाने जमिनीचा सातबारा असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)