‘एटीडीएम’चा पहिला प्रयोग यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:42 IST2017-08-15T00:42:05+5:302017-08-15T00:42:37+5:30
महसूल विभाग स्वातंत्रदिनी यवतमाळकरांना अनोखी भेट देणार आहे. आॅल टाईम डाक्यूमेंंट वेंडिंग मशीनचे (एटीडीएम) लोकार्पण.....

‘एटीडीएम’चा पहिला प्रयोग यवतमाळात
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महसूल विभाग स्वातंत्रदिनी यवतमाळकरांना अनोखी भेट देणार आहे. आॅल टाईम डाक्यूमेंंट वेंडिंग मशीनचे (एटीडीएम) लोकार्पण मंगळवार १५ आॅगस्ट रोजी येथील तहसील कार्यलयात होणार आहे. यापुढे आता दलाल पद्धत बंद होऊन सर्वांना मशीनद्वारे हवी ती कागदपत्रे मिळणार आहे. त्यातून वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
जिल्हा सेतू समितीच्या माध्यमातून यवतमाळ तहसील कार्यालयात ‘एटीडीएम’ मशीन प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. या अद्ययावत मशीनमध्ये चार लाख ९७ हजार स्कॅनिंग झालेल्या सत्यप्रती उपलब्ध आहेत. यामुळे तहसील कार्यालयात येणाºया प्रत्येक नागरिकांला कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहे. यामध्ये सातबारा, कोतवाल बुकाची नक्कल, फेरफार, हक्क नोंदणी यासह इतर प्रमाणपत्रे उपलब्ध होणार आहे. डिजीटल स्वाक्षरीने शेतकºयांना प्रमाणपत्र काही क्षणात मिळणार आहे.
ही मशीन पूर्णता स्वयंचलित असून टच स्क्रिनमुळे ती हाताळने सोपे जाणार आहे. हवे त्या प्रमाणपत्रासाठी प्राथमिक प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात प्रमाणपत्रांसाठी २० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यानंतर प्रमाणपत्र शेतकºयांच्या हाती पडणार आहेत.
जिल्ह्यातला पहिला प्रयोग यवतमाळात राबविला जात आहे. पालकमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाºरी सचिंद्र प्रतापसिंह यांच्या उपस्थितीत मशीनचे लोकार्पण होणार आहे. यातून सर्वसामान्यांची पिळवणूक थांबणार आहे.
- सचिन शेजाळ,
तहसिलदार, यवतमाळ