शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पोलीस अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच ‘स्ट्रेस-फ्री’ प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:01 PM

नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच तणाव विरहित (स्ट्रेस-फ्री) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहासंचालकांची संकल्पना तणाव, आरोग्य, कुटुंब, डायट, गुंतवणुकीवर सल्ला, संपूर्ण शरीराची तपासणी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच तणाव विरहित (स्ट्रेस-फ्री) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या तुकडीचे हे प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरी तुकडी सोमवारी १० जून रोजी प्रशिक्षणासाठी खंडाळा येथे रवाना होणार आहे.कोणतेही प्रशिक्षण म्हटले की वैताग येतो. त्यात पोलिसांचे प्रशिक्षण असेल तर परेड, शारीरिक कवायतींनी आणखी तणाव वाढतो. परंतु आता पहिल्यांदाच पोलिसांशी संबंधित तमाम विषय दूर ठेऊन पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी अशा प्रशिक्षणांची आवश्यकता विशद करून ही प्रशिक्षणे लगेच सुरूही केली. फौजदार ते पोलीस निरीक्षक या श्रेणीतील पदोन्नतीस पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पदोन्नती देण्यापूर्वी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील अकादमी आणि पुणे येथील महाराष्ट्र इन्टेलिजन्स अकादमीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या ३३ अधिकाऱ्यांची पहिली तुकडी खंडाळा येथे बोलविण्यात आली होती. २९ अधिकारी या प्रशिक्षणाला हजर होते. १३ दिवस प्रशिक्षण चालले. त्यातील तीन दिवस या अधिकाऱ्यांना परिवारासह प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला महासंचालक सुबोधकुमार जायसवाल स्वत: तर समारोपाला परिवारासह उपस्थित होते. या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी (होलबॉडी स्कॅन) करण्यात आली.

प्रशिक्षण अविरत सुरू राहणारजेवण व झोपण्याच्या अनियमित वेळांमुळे बहुतांश पोलिसांचे पोट निघते. अशा पोलिसांनी आपले आरोग्य कसे सांभाळावे, तणावमुक्त कसे रहावे, डायट कसे असावे, सेवानिवृत्तीनंतर जीवनमान कसे असावे, निवृत्तीचा पैसा भविष्यासाठी कुठे गुंतवणूक करावा, इतरांसाठी प्रेरणादायी कसे बनावे यासह कौटुंबिक सलोखा व अन्य विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने अविरत सुरू राहणार आहे.पोलीस अधिकाऱ्यांमध्ये समाधानपोलीस अधिकाऱ्यांनी महासंचालकांच्या या नव्या पिकनिक स्टाईल प्रशिक्षण संकल्पनेचे जोरदार स्वागत केले असून समाधानही व्यक्त केले आहे. २० ते ३० वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रशिक्षण अनुभवायला मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रशिक्षण दहा-पंधरावर्षाआधी सुरू झाले असते तर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गुणात्मक बदल झाला असता व त्यांच्या कुटुंंबासह पोलीस खात्यासाठी हा बदल फायद्याचा ठरला असता, अशा प्रतिक्रीया अधिकाऱ्यांमधून ऐकायला मिळाल्या.

टॅग्स :Policeपोलिस