यश, समृद्धीची पहिली पायरी म्हणजे शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:10 IST2017-09-07T22:10:39+5:302017-09-07T22:10:52+5:30
जगातील ज्या देशात दहशतवाद, विध्वंस आहे. त्या देशाची प्रगती एकदम खुंटते. कुणालाही समृद्धी आणि प्रगतीचे यशोशिखर गाठायचे असेल तर त्याचे पहिली पायरी शांतता होय, असे प्रतिपादन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले.

यश, समृद्धीची पहिली पायरी म्हणजे शांतता
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : जगातील ज्या देशात दहशतवाद, विध्वंस आहे. त्या देशाची प्रगती एकदम खुंटते. कुणालाही समृद्धी आणि प्रगतीचे यशोशिखर गाठायचे असेल तर त्याचे पहिली पायरी शांतता होय, असे प्रतिपादन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले.
दिग्रस शहरात शांततेत गणेश विसर्जन पार पडल्यानंतर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. शहराच्या प्राचीन परंपरेनुसार धावंडा नदीच्या तीरावर श्रीगणेश मंदिरात शेवटी आरती आयोजित केली जाते. त्या ठिकाणी विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित असते. तेथे तहसीलदार किशोर बागडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, जावेद पटेल, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजय कुकडी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, रमेश काळे, इम्रान, अरविंद मिश्रा, नूर महमद खान, रमजू पटेल, पूनम पटेल, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले, फैयाज मलनस, नायब तहसीलदार विठ्ठल कुमरे, संजय राठोड, व्ही.जी. इंगोले, तलाठी नारायण हगवणे, सहायक पोलीस निरीक्षक रंजित शिरसाट, सतीश वळवी, गणेश मोरे, राजेंद्र नाईक, बाबाराव पवार, निळकंठ चव्हाण, पुंडलिक वानखेडे, संजय नेटके, रूपेश चव्हाण, वीज अभियंता गणेश चव्हाण, नगरसेवक किशोर साबू, संजीव चोपडे, यादव गावंडे, नरेश राठोड, अशोक पवार, मजहर खान, सागर पडगिलवार, किशोर कांबळे, यशवंत सुर्वे, अब्दुल रफीक, रामदास पद्मावार, हनुमान रामावत, शरद गोविंदवार, अनंत उघडे आदी उपस्थित होते. यावेळी मंदिराचे पुजारी विजय शर्मा यांनी अधिकाºयांचा शेलानारळ देऊन सत्कार केला.