यवतमाळ हादरले! शहरात कोरोनामुळे पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:47 IST2020-07-06T17:47:08+5:302020-07-06T17:47:24+5:30
एकूण मृत्यूचा आकडा १३ : दिग्रसमध्ये तीन नवे पॉझिटिव्ह

यवतमाळ हादरले! शहरात कोरोनामुळे पहिला बळी
यवतमाळ : सोमवारी यवतमाळ शहरातील ४७ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा १३ वर पोहोचला असून यवतमाळ शहरातील हा पहिलाच मृत्यू नोंदविला गेला. शिवाय सोमवारी दिग्रसमध्ये तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अॅक्टीव्ह बाधित रुग्णांची संख्या ७३ झाली असून आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ३२६ झाला आहे. या पैकी २२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना मृत्यूच्या वाढत्या संख्येने प्रशासन चिंतेत आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व रहिवासी परिसरातील डझनावर लोकांना क्वॉरंटाईन केले जात आहे. तसेच त्याचा रहिवासी परिसर सील केला जात आहे.