वणीत सहा दुकाने बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:17+5:30

आगीचे लोळ वीज तारांपर्यंत पोहोचल्याने वीज तारांमधून मोठ्या प्रमाणावर आगीच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे परिसरातील लोक भितीने सैरावैरा पळत होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. वणी शहरात मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली.

Fire six shops in Wani | वणीत सहा दुकाने बेचिराख

वणीत सहा दुकाने बेचिराख

Next
ठळक मुद्देसिलिंडरचा स्फोट : गॅस गळतीने घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास स्थानिक एकतानगरमधील एका दुकानात सिलिंडरमधील गॅस गळती झाल्याने सदर दुकानाने पेट घेतला. पाहतापाहता या आगीने अवतीभवतीच्या पाच दुकानांना आपल्या विळख्यात घेतले. या आगीत दुकानातील सिलिंडरचा स्फोटही झाला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीत पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने पराकोटीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
आगीचे लोळ वीज तारांपर्यंत पोहोचल्याने वीज तारांमधून मोठ्या प्रमाणावर आगीच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे परिसरातील लोक भितीने सैरावैरा पळत होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. वणी शहरात मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली. या सभेची गर्दी रस्त्याने परत जात असतानाच एकतानगरमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका चिकन विक्रीच्या दुकानातील सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे सिलिंडरने पेट घेऊन संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच दुकानातील सिलिंडरचा स्फोट झाला आणि अवतीभवतीच्या पाच दुकानांनाही आगीने विळखा घातला. या आगीत शब्बीर नामक इसमाचे चिकन विक्री सेंटर, शबाना निझाम शेख यांचे हॉटेल, मालाबाई यांचे झुणका भाकर केंद्र, तोहसीन शेख यांचे दूध विक्री केंद्र, नानाजी काळे यांचे सलून, ऋषी पेंदोर यांचे कापड प्रेसचे दुकान जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच वणी नगरपालिकेचे अग्नीशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अग्नीशमन दलाने अर्धा तास अथक परिश्रम घेऊन या आगीवर नियंत्रण मिळविले.

Web Title: Fire six shops in Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग