शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

आगीत सहा घरांसह गोठा भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 9:49 PM

रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा घरांसह गोठा जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील कोनदरी (वाकान) येथे बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

ठळक मुद्देकोनदरीची घटना : पाच लाखांचे नुकसान, रोहित्राच्या शॉर्टसर्किटने लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा घरांसह गोठा जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील कोनदरी (वाकान) येथे बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.कोनदरी येथे असलेल्या रोहित्रामध्ये सकाळी शॉर्टसर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणग्या घरावर पडल्या. त्यामुळे घराने पेट घेतला. त्यातच सकाळी वारा वेगाने वाहत असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. परंतु गावात पाणीटंचाई असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. पक्क्या विटा व टीनपत्र्याच्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. दरम्यान पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच पुसदचा बंब पोहोचला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.आगीत सुधाकर धनसिंग राठोड, मनीष चंद्रभान राठोड, दिलीप चंद्रभान राठोड, अनिल चंद्रभान राठोड, सुनील चंद्रभान राठोड, संदीप चंद्रभान राठोड यांची घरे भस्मसात झाली. तसेच एक गोठा जळून खाक झाला. घरातील सर्व साहित्य बेचिराख झाले. यात दीडशे टीनपत्रेही जळाले. तसेच गोठ्यातील ४० पीव्हीसी पाईप, कडबा, कुटार व शेतीपयोगी साहित्य असे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार नामदेव इसाळकर, नायब तहसीलदार गजानन कदम, नितीन भुतडा यांनी भेट दिली. आमदार राजेंद्र नजरधने यांनी सानुग्रह मदत देण्याच्या सूचना दिल्या.रोहित्र हटविण्याची केली होती मागणीकोनदरी येथील अगदी गावात एक सिंगल फेज आणि दुसरे थ्री फेज असे दोन रोहित्र अगदी जवळ आहे. या रोहित्रातून नेहमी आगीच्या ठिणग्या उडत होत्या. याबाबत संबंधितांनी वीज वितरणला वारंवार कळविले. परंतु दखल घेतली नाही. परिणामी बुधवारी सहा घरांची राखरांगोळी होऊन कुटुंब उघड्यावर आले.

टॅग्स :fireआग