यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंग फॅक्टरीत आग; कापूस व सरकी जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:26 IST2018-03-23T15:25:42+5:302018-03-23T15:26:09+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील आशापुरा जिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आग लागली.

यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंग फॅक्टरीत आग; कापूस व सरकी जळाली
ठळक मुद्देनुकसानाचा अंदाज अद्याप नाहीकुठलीही जिवीतहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील आशापुरा जिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आग लागली. पाहता पाहता या आगीने भीषण रुप धारण केले व त्यात फॅक्टरीमधील कापूस व सरकी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. या आगीमुळे किती नुकसान झाले त्याचा आकडा अद्याप सांगता येत नाही. वृत्त लिहेस्तोवर आग विझवण्याचे काम सुरूच होते.