अखेर पायलच्या शिक्षणाचा मार्ग झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:31 IST2018-07-22T21:31:26+5:302018-07-22T21:31:39+5:30
तालुक्यातील शिवर-भंडारी येथील पायल ठवकर हिला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग अवरूद्ध झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला अन त्यातून तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला.

अखेर पायलच्या शिक्षणाचा मार्ग झाला मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील शिवर-भंडारी येथील पायल ठवकर हिला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग अवरूद्ध झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला अन त्यातून तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला.
पायलसाठी आर्णीसह जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरूनही संवेदनशील दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. थेट मुंबई, कोल्हापूर, ठाणे, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील अनेकांनी हात पुढे केल्याने तब्बल ५१ हजार रूपये गोळा झाले. रविवारी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात ही रक्कम पायल व तिच्या आईला सुपूर्द करण्यात आली. यात महागाव तालुक्यातील सवना येथील सहाय्यक प्राचार्य डॉ.केशव चेटूले यांच्या पुढाकारातून कुणबी समाज बांधवांच्या ‘वॉटसप’ समूहाकडून थेट पायलच्या बँक खात्यात २० हजार रूपये जमा करण्यात आले.
आर्णीतील शिवजंयत्ती ऊत्सव समिती, जिजाऊ शिक्षण सहाय्यता समिती, तालुका प्राथमिक शिक्षक संघ (२३५), जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, ठाणेदार यशवंत बावीस्कर, न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी, तहसीलदार संदीप भस्के, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रावते, तलाठी विरेंद्र चौधरी, नितीन गावंडे, आसाराम चव्हाण, राजू र्इंगोले, सुधीर कोषटवार, संदीप ढोले, सचिन ठाकरे, बाबाराव वानखडे, गजानन ठाकरे, दिनेश चौधरी, मधुकर ठाकरे, अॅड.प्रमोद चौधरी, अंबिका बुक डेपो, मामा ठाकरे, बबनराव मुंडवाईक, नितीन मेश्राम, विलास खाडे, आनंद पद्मावार, रवि चिद्दरवार, तुकाराम चव्हाण, राजकुमार महल्ले, अमोल जगताप, आशिष जगताप, तुळशिराम बोक्से, अमोल गावंडे, शरद लोंढे, खुशाल ठाकरे, सुभाष बरडे, प्रवीण काळे, अशोक चेटुले, भगवंतराव ईश्वरकर, पांडुरंग मुटकुरे, पी.आर. ठवकर, किशोर गायधनी, चंद्रशेखर पंचबुधे, सुधीर मते, रवींद्र मते, प्रकाश खाटीक, पियूष लुटे, अरुण निंबार्ते आदींनी मदत केली.
पायलचे अश्रू झाले अनावर
पायलने मदत स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त केले. यावेळी तिचे अश्रू अनावर झाले होते. वडील नसताना आईने केलेला संघर्ष तिने कथन केला. यावेळी वातावरण अत्यंत भावूक झाले होते. तिच्या आईच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी यांनी पायलने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, स्वत:च्या पायावर उभे राहून समाजातील गरजूंना मदत करून रिटर्न गिफ्ट द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.