शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

निलय नाईकांचा अखेर भाजपा प्रवेश

By admin | Updated: October 28, 2016 02:06 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. निलय नाईक यांनी अखेर गुरुवारी भाजपात प्रवेश घेतला.

पुसद : यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. निलय नाईक यांनी अखेर गुरुवारी भाजपात प्रवेश घेतला. मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅड. निलय नाईक भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. दोन दिवसापूर्वी त्यांचे दोन खंदे समर्थक नीळकंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नीरज पवार यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. त्यामुळे अ‍ॅड. निलय नाईकही लवकरच भाजपात जाणार अशा चर्चेला जोर आला होता. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अ‍ॅड. निलय नाईक यांनी सुधाकरराव नाईक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढविली होती. मनोहरराव नाईक यांच्या विरोधात ही निवडणूक लढविल्याने तेव्हापासून राजकीय तेढ निर्माण झाले होते. त्यावेळी निलय नाईकांना राष्ट्रवादी पक्षातून डच्चू दिला होता. त्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु १५ वर्षांपासून राजकीय अस्तित्व दिसत नव्हते. त्यांच्या समर्थकांनाही कुठे वाव नव्हता. अखेर अ‍ॅड. नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)