दोषी कृषी केंद्रांवर होणार गुन्हे दाखल

By Admin | Updated: May 28, 2014 00:01 IST2014-05-28T00:01:22+5:302014-05-28T00:01:22+5:30

कृषी केंद्रांच्या परवान्याचे नूतनीकरण न करताच राजरोसपणे शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत जास्त नफा व अधिक खप दाखवून कंपन्यांकडून मिळणार्‍या विदेशी यात्रेच्या पॅकेजच्या

Filing complaints against guilty agricultural centers | दोषी कृषी केंद्रांवर होणार गुन्हे दाखल

दोषी कृषी केंद्रांवर होणार गुन्हे दाखल

बिटरगाव : कृषी केंद्रांच्या परवान्याचे नूतनीकरण न करताच राजरोसपणे शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत जास्त नफा व अधिक खप दाखवून कंपन्यांकडून मिळणार्‍या विदेशी यात्रेच्या पॅकेजच्या हव्यासापायी त्यांची फसवणूक करणार्‍या औषधी विक्रेत्या व्यावसायिकांची मंगळवारी लोकमतमधील वृत्त प्रकाशित होताच चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी यवतमाळ गाठले. त्यातच यामध्ये जे कृषी केंद्र चालक दोषी आढळतील, त्यांची कोणतीही गय न करता अशांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

अनेक कृषी केंद्र चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून सकाळीच नूतनीकरणासाठी यवतमाळकडे निघणे पसंत केले. तत्पूर्वी त्यांनी आपल्याकडील बोगस बियाणे, औषधी व पक्क्या बिलाऐवजी असलेले कच्चे टिपण असलेल्या रेकाँर्डची सुरक्षित ठिकाणी तात्पुरती विल्हेवाट लावल्याची माहिती आहे. कारण भरारी पथकांकडून हे सर्व रेकॉर्ड कधीही तपासल्या जाऊ शकते. तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांचेही आता बारीक लक्ष याकडे असणार आहे. त्यातच आता शेतकरीसुद्धा सावध झाले आहे. ज्यांनी बियाणे विकत घेतली आहेत, त्यांनीसुद्धा आपल्याला देण्यात आलेले बियाणे बोगस तर नाही नाही, याची चौकशी करण्यासाठी सबंधित कृषी केंद्र दुकानांमध्ये धाव घेतली. परंतु ही दुकाने बंद असल्याचे त्यांना आढळले.

बोगस बियाणे व खते यासंदर्भात पुन्हा तालुका कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, बिटरगाव येथील सर्व कृषी केंद्र दुकानांचे रेकॉर्ड तपासण्यात येतील आणि यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, त्यामुळे कुणीही शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मंगळवारी सकाळपासूनच अनेक शेतकर्‍यांनी दूरध्वनीद्वारा व प्रत्यक्ष भेटून कृषी विभागाकडे कृषी केंद्र चालकांच्या तक्रारी केल्याची माहिती आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातून आलेले जास्त नफा देणारे कपाशीचे बियाणे, शिवाय बॅ्रण्डेड कंपनीचे कव्हर व लेबल लावून असलेले निकृष्ट बियाणे, नामसाधम्र्य असलेल्या कंपनीच्या बियाण्यांची त्याच कंपनीचे बियाणे असल्याचे सांगणे, पक्के बिल न देणे, बियाण्यांची टंचाई असल्याचे सांगून प्रचंड भावात विक्री करणे आदी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांनी परवान्याचे नूतनीकरण न करताच सर्रास व्यवसाय सुरू ठेवला आहे, अशांचे नूतनीकरणसुद्धा न करता त्यांचे परवानेच रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सक्षम अधिकार्‍यांकडून कृषी केंद्रांची योग्य चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Filing complaints against guilty agricultural centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.