आॅनलाईन भूखंड अर्र्जही टप्प्याटप्प्याने
By Admin | Updated: March 6, 2017 01:18 IST2017-03-06T01:18:06+5:302017-03-06T01:18:06+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आॅनलाईन भूखंड अर्र्जही टप्प्याटप्प्याने
एमआयडीसी : विकसितशिवाय प्रक्रिया नाही
यवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात सध्या नवीन भुखंडासाठी अर्ज स्वीकारणे बंद आहे. संपूर्ण विकसित भूखंड उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होत आहे.
एमआयडीसीमधील भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. परंतु वर्षभर आॅनलार्र्ईन अर्ज स्वीकारण्याची लिंक सुरू न ठेवता, ज्या एमआयडीसीमध्ये भूखंड वितरणासाठी उपलब्ध आहे, त्याची आगाऊ सूचना देऊन काही दिवसांसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात आणि पुन्हा लिंक बंद करण्यात येते. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी साठी टप्प्याटप्प्याने भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुसद येथील ७० ते ८० व दिग्रस येथील दोन भूखंडासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. १ मार्चपर्यंत यासाठी लिंक सुरू होती. परंतु त्यानंतर ती बंद करण्यात आली. आता आलेल्या अर्जांवर विचार करून भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर इतर एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध असल्यास त्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील.
जिल्ह्यातील काही एमआयडीसींमध्ये भूखंड शिल्लक असले तरी ते विकसित नसल्याने त्यांचे वितरण करण्यात येत नाही. ज्या एमआयडीसींमध्ये रस्ते, वीज व पाणी अशा सर्व सोयी भूखंडापर्यंत पोहचल्या आहेत, तेच भूखंड वितरीत करण्याचे एमआयडीसीचे धोरण आहे. येत्या काळात कळंब, घाटंजी व दारव्हा येथील भूखंडांसाठी लिलाव पद्धती राबविली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नवीन भूखंड घेऊन नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या किंवा आहे तो उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उद्योजकांनी तयार असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)