शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सण-उत्सव, निवडणुकीचा पोलिसांवर पडला ताण

By admin | Updated: September 21, 2014 23:59 IST

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आता लागू झाली आहे. याच काळात विविध सण, उत्सव येत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पोलिसांना

वणी : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आता लागू झाली आहे. याच काळात विविध सण, उत्सव येत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पोलिसांना सुखाची झोप मिळणे दुरापास्त होणार आहे.वणी उपविभागात वणीसह, मारेगाव, मुकुटबन, शिरपूर आणि पाटण येथे पोलीस ठाणे आहे. वणीला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या पाचही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील काही गावे संवेदनशील आहेत. काही गावे नक्षल प्रभाविीा आहेत. या उपविभागाची सीमा आंध्र प्रदेशला लागून आहे. आंध्र प्रदेशात नक्षली कारवाया जादा असतात. त्याचा फटका सीमावर्ती पोलीस ठाण्यातील काही गावांनाही बसतो. त्यामुळे वणी उपविभागातील पोलिसांना सतत जागृत राहावे लागते. उपविभागातील पाचही पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी दुर्गादेवींची स्थापना केली जाते. गेल्या काही वर्षांपासून दुर्गादेवीच्या मूर्ती स्थापनेत वाढ झाली आहे. खुद्द वणी पोलीस ठाण्याच्या मागेच दरवर्षी दुर्गा मूर्तीची स्थापना केली जाते. गावोगावी मोठ्या प्रमाणात मूर्तींची स्थापना होत असल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याला नवरात्रात पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. त्यासाठी पोलीस बळ कामी जुंपावे लागते. नवरात्राची सांगता विजया दशमीने होते. त्यानंतर बकरी ईद हा पवित्र सणही येतो. या सर्व सणांनंतर १५ दिवसांतच दिवाळीची सुरूवात होते. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात विविध धर्मीयांचे विविध सण येतात. त्यामुळे दरवर्षी पोलिसांना बंदोबस्त लावावा लागतो. आता यावर्षी या सणांसोबतच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताणही वाढला आहे. सर्व धर्मीयांचे सण आणि निवडणूक बंदोबस्त लावताना पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक आणि उमेदवारांच्या रॅलीने पोलिसांची भंबेरी उडण्याची शक्यता आहे. नवरात्राला येत्या २५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. त्याच काळात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात होणार असल्याने पोलिसांची चांगलीच कसोटी लागण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)