कोळसाखाणग्रस्त शेतकºयांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:56 IST2017-10-30T21:56:20+5:302017-10-30T21:56:32+5:30
वेस्टर्न कोल लिमिटेड या कोळसा कंपनीच्या वणी नॉर्थ एरियातील बेलार, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील शेतकºयांना मागील पाच वर्षांपासून शेतीचा मोबदला मिळालेला नाही.

कोळसाखाणग्रस्त शेतकºयांचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वेस्टर्न कोल लिमिटेड या कोळसा कंपनीच्या वणी नॉर्थ एरियातील बेलार, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील शेतकºयांना मागील पाच वर्षांपासून शेतीचा मोबदला मिळालेला नाही. महसूल विभागाने तुकडेबंदीच्या नियमाची ऐसीतैसी करून सातबाºयामध्ये प्रचंड घोळ केला आहे. त्यामुळे वेकोलिने शेतीचा मोबदलाच दिला नाही. हा अन्याय दूर व्हावा यासाठी तिन्ही गावातील शेतकºयांनी यवतमाळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
नायगाव डीप ओपनकास्ट या कोळसा खाणीत तीन गावातील शेतकºयांची जमीन गेली. यासाठी २०१२ पासून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्यक्षात कोणताच मोबदला शेतकºयांना मिळाला नाही. या बाबत सातत्याने पाठपुरावा करूनही वेकोलि व महसूल प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते. ही समस्या घेऊन शेतकरी १३ आॅक्टोबर रोजी यवतमाळला आले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना या प्रकरणात १५ दिवसामध्ये तोडगा काढावा अशा मागणीचे निवेदन दिले. यावर कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी शेतकºयांनी सोमवारपासून पोस्टल मैदान परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वेकोलि व महसूल प्रशासनाने शेतकºयांना शेतीचा मोबदला आणि वेकोलित नोकरी द्यावी या दोन प्रमुख मागण्या आहेत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. वेकोलिने भूसंपादनासाठी २७ आॅक्टोबर २०१७ मध्ये कायद्यातील सेक्शन ११ सीबीएचा आधार घेऊन त्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप शेतकºयांना कोणताच लाभ मिळालेला नाही. मोबदला नसतानाही प्रकल्पबाधित शेतकरी जमीन वहिती करू शकत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. उपोषणात शंभरावर शेतकरी सहभागी झाले आहे.