शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या किमती भडकल्या; टनामागे अडीच हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:27 IST

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी रासायनिक खतांवर सबसिडी देण्यात येते. ही सबसिडी कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानाही खताच्या किंमती मात्र यावर्षी टनामागे अडीच हजाराने वाढल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन नफा घटणार आहे. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.खत ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना हादरापॉसचा उतारा की महागाई केंद्र शासनाने खतावरील सबसिडी नियंत्रणासाठी पॉस मशीनचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे खताचा संपूर्ण व्यवहार आॅनलाईन झाला आहे. यातून कंपन्यांची अनुदानित सबसिडी मर्यादित झाली. बोगस प्रकाराला चाप लागला आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपला नफा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी रासायनिक खतांवर सबसिडी देण्यात येते. ही सबसिडी कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानाही खताच्या किंमती मात्र यावर्षी टनामागे अडीच हजाराने वाढल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन नफा घटणार आहे. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.खत विक्री करताना कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पॉस मशीनचा प्रयोग राबविण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सबसिडी चोरीला आळा बसण्यास मदत झाली. तर दुसरीकडे कंपन्यांनी फॉस्पेटचे दर वाढल्याने खताच्या किंमती परवडणाऱ्या नसल्याचे कारण सांगत दर वाढविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी यंदाच्या हंगामात अधिक पैसे मोजावे लागणार आहे.शेतमालाचे दर जैसे थे आहे. इतकेच नव्हे तर काही धान्यांच्या किंमती खाली घसरल्या आहे. बियाणे, खत, मजुरी आणि विजेचे दर वाढत असताना शेतमालाच्या किंमती कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अल्प पैसे येत आहे. ही कृषी क्षेत्रासाठी चिंतेची बाब मानली जाते. आता येणाऱ्या हंगामात खताची बुकींग करताना सुधारित किंमती जाहीर केल्या आहे. यामध्ये काही प्रमुख खतांवर ५० किलोला २०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. इतर खतांच्या पोत्यांवर १०० रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आली आहे. कॉम्पलेक्स खताच्या किंमती टनाला १६०० रुपयाने वाढले आहे. तर डीएपीच्या किंमतीत टनामागे दोन हजार ५०० रुपये वाढ झाली आहे. मिश्र खताच्या शासकीय कारखान्यात सध्या शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तर खासगी कंपनीधारक मिश्र खतांच्या निर्मितीसाठी सज्ज आहेत. या ठिकाणी तपासणी होण्याची गरज आहे. कंपन्यांचे डिलर जीएसटीमुळे फॉस्पेटच्या किंमती वाढल्याचे सांगत आहे. त्यातूनच खताचे दर वाढल्याचे गणित मांडले जात आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र