अंशकालीन स्त्री परिचरांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:06 PM2017-12-12T22:06:02+5:302017-12-12T22:06:21+5:30

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

Fertile Feminists Fasting | अंशकालीन स्त्री परिचरांचे उपोषण

अंशकालीन स्त्री परिचरांचे उपोषण

Next

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
अंशकालीन स्त्री परिचरांच्या विविध समस्या आहे. त्याबाबत वारंवार शासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलन करण्यात आले. मात्र पाठपुरावा करूनही अद्याप स्त्री परिचरांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून अंशकालीन स्त्री परिचरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या परिचरांना दरमहा १२०० रूपये मानधन दिले जाते. मात्र तब्बल आठआठ महिने मानधन रखडते. मानधन जमा करण्यास हयगय करणाºयांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी. मानधनात दरमहा किमान ६०० रूपयांची वाढ करावी, या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात प्रिया आत्राम, विनंता मेश्राम, कुसूम गंधेवार, कुसूम मानकर, पिंटूबाई पोतराजवार, अंजना मडावी, कविता चव्हाण, लक्ष्मी देशेवार, कमल वेले, भागरथा विरंगे, संगिता राऊत, सविता वरनकर, सुमित्रा व्यवहारे, इंदुबाई बन्सोड आदींसह अनेक अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या आहेत.

Web Title: Fertile Feminists Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.