पित्याने दीड वर्षाच्या चिमुरड्याला आदळून केले ठार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:05 IST2020-05-18T10:05:09+5:302020-05-18T10:05:34+5:30
दीड वर्षीय चिमुरड्याला क्रूरकरम्या पित्याने जमिनीवर आदळून ठार मारल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

पित्याने दीड वर्षाच्या चिमुरड्याला आदळून केले ठार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: दीड वर्षीय चिमुरड्याला क्रूरकरम्या पित्याने जमिनीवर आदळून ठार मारल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. सावन पिंटू चव्हाण असे मृत बालकाचे नाव आहे. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मृत बालकाचा पिता पिंटू सुधाकर चव्हाण (२७) याने रागाच्या भरात लहानग्या सावनला उचलून जमिनीवर आदळले. त्यात निरागस सावनचा अंत झाला. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी आरोपी पिंटू सुधाकर चव्हाण याला अटक केली आहे. पिंटू हा दारूच्या आहारी गेला होता, असे सांगितले जाते. दारुवरून वाद झाला. या वादात पिंटूने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.