धनगर आरक्षणासाठी तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:31 IST2018-08-06T21:31:44+5:302018-08-06T21:31:59+5:30
धनगर आरक्षण न दिल्यास १३ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

धनगर आरक्षणासाठी तीव्र आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धनगर आरक्षण न दिल्यास १३ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला तत्काळ आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाही. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यशासनाला १२ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासोबतच धनगर बांधवांना चराई पास देण्यात यावी, धनगर आरक्षणासाठी शहीद झालेल्या परमेश्वर घोंगडे आणि सतीश होळकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी धनगर समाजबांधवांनी शासनाच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिलेले आश्वासन सरकारकडून पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. आरक्षणाविषयीसुद्धा शासन चार वर्षांपासून केवळ आश्वासन देत असल्याचे समितीने म्हटले आहे.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अविनाश जानकर, कार्याध्यक्ष रमेश जारंडे, सचिव विठ्ठल बुच्चे, उपाध्यक्ष दीपक पुनसे, कोषाध्यक्ष संदीप पुनसे, पांडुरंग खांदवे, डॉ. संदीप धवने, संजय शिंदे पाटील, श्रीधर मोहड, बाळासाहेब शिंदे, कृष्णराव कांबळे उपस्थित होते.