पीक विम्याच्या पैशासाठी यवतमाळमध्ये 'जवाब दो' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 14:28 IST2020-12-28T14:25:15+5:302020-12-28T14:28:05+5:30
Farmers Protest in Yavatmal : पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या मागणीसाठी यवतमाळ येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.

पीक विम्याच्या पैशासाठी यवतमाळमध्ये 'जवाब दो' आंदोलन
यवतमाळ - शेती पिकाचे नुकसान होऊनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात यवतमाळ येथे सोमवारी 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.
स्टेट बँक चौकात सभा घेण्यात आली. साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. प्रत्यक्षात नऊ हजार ५०० शेतकऱ्यांना तात्पुरती भरपाई मिळाली. इतर शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा नाकारण्यात आला. याच प्रश्नांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये ठिकठिकाणचे शेतकरी सहभागी झाले होते.