सडलेले पीक दाखवत शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:05+5:30

केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, कापूस पिकाची कितपत माहिती असावी याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली.

Farmers' outcry shows rotten crop | सडलेले पीक दाखवत शेतकऱ्यांचा आक्रोश

सडलेले पीक दाखवत शेतकऱ्यांचा आक्रोश

Next
ठळक मुद्देकेंद्रीय पथक : नेर तालुक्यातील पाच शिवारात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : परतीचा पावसाने झालेल्या नुकसानीची महिनाभरानंतर केंद्रीय पथकाने शुक्रवारी शेतांना भेटी देऊन पाहणी केली. नेर तालुक्यातील शेतशिवारात हे पथक पोहोचताच शेतकऱ्यांनी सडलेले सोयाबीन दाखवित मदतीसाठी आक्रोश केला.
केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, कापूस पिकाची कितपत माहिती असावी याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली. वटफळी येथे दुपारी ओंकार खोब्रागडे, प्रफुल्ल गायनर, बबन केंबल, कोमल जैन, प्रशांत चौधरी आदींच्या पिकांची पाहणी केली. मागील वर्षीची मदत अजूनही मिळाली नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पथकाने लोणी येथील बांगर यांच्या कपाशीची पाहणी केली. नंतर हे पथक मोझर येथील राजेंद्र साखरकर यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी सोयाबीनची अवस्था पथकाला सांगितल्यावरही अधिकाºयांनी पाऊस कधी आला, पेरणी कधी केली, पीक केव्हा काढले अशी चोरासारखी चौकशी सुरू केली. याबाबत सरपंच गजानन गासे, मनोहर साखरवाडे, राहुल काळे, सुरेश दानखडे, गजानन चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. कपाशीची बोंडे अतिपावसामुळे बारिक झाल्याची माहिती लोणी येथे प्रहारचे तालुका प्रमुख गोपाल चव्हाण यांनी दिल्यावरही बारिक बोंडांनी काय फरक पडतो असा उलट प्रश्न पथकातील अधिकाºयांनी विचारला.
या पथकात डॉ.आर.पी. सिंह यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, दारव्हा एसडीओ इब्राहीम चौधरी, एसएओ नवनाथ कोळपकर, नेरचे तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, कृषी अधिकारी नामदेव कुमरे, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुंटलावार, तलाठी भारती धांदे, एस.आर. माहुरे उपस्थित होते. जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले. तर केंद्रीय पाहणीचा अहवाल जाईपर्यंत शेतकरी कशाच्या आधारे जगेल असा सवाल जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांनी उपस्थित केला.

सडलेल्या सोयाबीनचे मांडले दुकान
घारेफळ येथे अनिल खोडे यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. तर सातेफळ येथील शेतकºयांनी नेर बाजार समितीचे सभापती रवींद्र राऊत यांच्या नेतृत्वात सडलेले सोयाबीन व कपाशीची बोंडे रस्त्यावर आणून टाकली. यावेळी हिंमत धोटे, संतोष किरकीटे, भास्कर किरकीटे, विजय हळदे, अरुण काळे, सुमन पिसोळे, राहुल ठोंबरे, गणेश खोडे यांनी रस्त्यावर सडलेल्या सोयाबीनचे आणि कपाशीचे स्टॉल लावले.

Web Title: Farmers' outcry shows rotten crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.