शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची भिस्त आता खरिपातील कपाशी अन् सोयाबीनवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे.

प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यावेळी पाऊस उशिरा आल्यामुळे  शेतकऱ्यांनी मूग, ज्वारी, उडदाच्या पिकाकडे पाठ फिरविली आहे. आता त्यांची सर्व भिस्त कपाशी आणि सोयाबीनवर अवलंबून आहे.तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे. सोयाबीनपेक्षा तब्बल दोन हजार हेक्टर क्षेत्रात जादाची कपाशी लागवड करण्यात आली आहे. 

पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे क्षेत्र घटलेमागीलवर्षी मूग, उडदाची लागवड जास्त करण्यात आली होती. यावर्षी ती  अर्ध्यापेक्षा कमी करण्यात  आली. ज्वारीची लागवड ५०० हेक्टरवर झाली होती. यंदा ती २२५ हेक्टरवर आली आहे. शेतकऱ्यांनी  कापूस आणि सोयाबीनला महत्त्व दिले आहे.

तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्णसद्यस्थितीत जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली. कपाशी, तूर व सोयाबीन पीक समाधानकारक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशी पिकाचा पेरा वाढलेला दिसतो. पावसाच्या उशिरा आगमनामुळे मूग, उडीद, ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. सोयाबीन पिकाबाबतीत ज्या शेतात पाणी साचत असेल, अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी सरी काढावी.- अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, दिग्रस

३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरा- उशिरा पावसामुळे सुरुवातीला पेरण्या खोळंबल्या होत्या. तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी तयार केलेले क्षेत्रापैकी आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहे. - यावेळी पावसाने दांडी मारल्याने अनेकांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. आता जोरदार पाऊस पडत असल्याने अनेकांच्या पिकांना मार बसला आहे. - शेतात पाणी जमा झाल्याने पिके पाण्यात सापडली आहे. एकंदरीत यावर्षी शेतकऱ्यांना शेती करताना मोठी कसरत करावी लागत आहे. आता अतिवृष्टीने तडाखा दिल्याने पिके पुन्हा संकटात सापडली आहे. 

शेतकऱ्यांची प्रतिक्रियामूग, उडीद आणि ज्वारी या पिकांना ठराविक काळात पाणी लागते. अनियमित पावसामुळे पिके बरोबर येत नाही. पिकांना जंगली जनावरांचा मोठा त्रास असतो. रानडुक्कर, रोही उभी ज्वारी नेस्तनाबूत करतात. दुसरीकडे मजुरांची कमतरता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.  सोयाबीन आणि कापसाला भाव चांगले असल्यामुळे यावर्षी या पिकांकडे जादा कल आहे.- सुभाष राठोड, विठाळा

नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीन या पिकाला अधिक महत्त्व दिले जाते. उडीद, मूग आणि ज्वारीला या पिकाला मजूर लागते. ते वेळवर भेटत नाही. त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करते. हे पीक मेहनतीला पुरत नाही. भाव कमी राहतात. त्यामुळे कापूस, सोयाबीनला पसंती दिली आहे.- शंकर भालेराव, फेटरी

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती