शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे प्रश्न राहिले दुर्लक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:47 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर

लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : पावसाने मारलेली दडी, अतिवृष्टी व परतीच्या पावसाने केलेले नुकसान, यातून सावरून शेतकरी सध्या शेतातील सोयाबीन, कापूस काढणीवर भर देत आहे. कापूस व सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करून खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत; परंतु त्यांच्या प्रश्न व मागण्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.

लोकप्रतिनिधी, राजकीय व शेतकरी नेते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. कापूस, सोयाबीनची हमीभावापेक्षा कमीने खरेदी करून खासगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. तालुक्यात कुठेही शासनाची खरेदी सुरू झाली नाही किंवा शासनाची कापूस व सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शेतकरी नेता करताना दिसून येत नाही. सत्ताधारी पक्षाची मते कमी न व्हावी म्हणून नाफेडची सोयाबीन व सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात येत असल्याचे भासवून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यास लावण्यात येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एका महिन्यापूर्वी सोयाबीन विक्री करण्याकरिता ऑनलाइन नोंदणी केली आहे; परंतु सोयाबीनची शासकीय खरेदी काही सुरू करण्यात आलेली नाही.

कापसाच्या बाबतीतसुद्धा तेच धोरण अवलंबिण्यात आल्याचे दिसून येत आहे. सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार असल्याचे सांगत बाजार समितीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन केले होते; परंतु सीसीआयची कापूस खरेदी केव्हा सुरू होणार, याचे उत्तर बाजार समितीचे सचिव किंवा प्रशासक देऊ शकत नाही. खरं तर बाजार समितीच्या वतीने हमीभावापेक्षा कमीने सोयाबीन व कापसाची खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांवर दंडात्मक तथा फौजदारी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. 

व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीबाबत चुप्पी२० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेद- वारांच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषणे ठोकण्यात येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांद्वारे होत असलेल्या लुटीबाबत कोणताही उमेदवार ब्र काढताना दिसून येत नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४FarmerशेतकरीfarmingशेतीYavatmalयवतमाळ