शालिवाहनासमोर शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:33 IST2018-02-23T23:33:06+5:302018-02-23T23:33:06+5:30
तालुक्यातील चनाखा येथील शालिवाहना बायोगॅस कंपनीसमोर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

शालिवाहनासमोर शेतकऱ्यांचे उपोषण
ऑनलाईन लोकमत
वणी : तालुक्यातील चनाखा येथील शालिवाहना बायोगॅस कंपनीसमोर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी दिला आहे.
या कंपनीच्या प्रदूषण व सांडपाण्यामुळे परिसरातील १२ शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.
तसेच कंपनीने शेतकऱ्यांजवळून घेतलेल्या कच्च्या मालाबाबत दुजाभाव केला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला अल्प दर देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी दिला आहे.