शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक कर्जासाठी शेतकऱ्यांची परवड

By admin | Updated: March 12, 2015 02:16 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जाचक अटी व धोरणामुळे शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची परवड होत असून शेकडो शेतकरी शैक्षणिक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवित आहे.

दिग्रस : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जाचक अटी व धोरणामुळे शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची परवड होत असून शेकडो शेतकरी शैक्षणिक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवित आहे. मंजूर रक्कम वेळेवर मिळत नसल्याने पाल्यांचे शैक्षणिक सत्र धोक्यात आले आहे. तसेच कृषी कर्जासोबतच सातबारावर हा बोझा नोंदविला जात असल्याने इतर बँकांकडे कर्जासाठी जाण्याचा मार्गही बंद झाला आहे.उच्च शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनाने शैक्षणिक कर्जाची सोय केली आहे. राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकातून शेतकऱ्यांना पाल्यांच्या शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना नियम व अटी सांगून टोलविले जाते. शेतकऱ्यांची हक्काची बँक असलेल्या जिल्हा बँकेत शेतकरी कर्जासाठी येतात, त्या ठिकाणीही त्यांची परवड होत आहे. पश्चिम विदर्भातील शेतकरी पूत्रांसाठी विशेष सवलत म्हणून बिनव्याजी शैक्षणिक कर्जाची तत्कालीन पंतप्रधान पॅकेजमधून व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्जासाठी गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज वाटपाचे धोरण जाहीर केले आहे. मात्र विविध शाखांकडून कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर निधी नसल्याचे कारण पुढे करून शैक्षणिक कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पाल्य उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहत आहे. सहकारी सोसायटीमार्फत वितरित होणाऱ्या कर्जाबाबत अव्वाच्या सव्वा अवाजवी बोझा शेतकऱ्यांच्या सातबारावर चढविला जातो. त्यामुळे शेती व्यवसायाकरिता इतर बँकेकडे कर्ज मागणी हक्क हिरावून घेतला जातो. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सोसण्याची वेळ आली आहे. शेतीच्या मूल्यांकनावर आधारित कर्ज वितरण व्हावे, वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासह इतर मागण्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र राऊत यांनी केले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये साठी जाचक अटी रद्द करून तत्काळ व वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी एका निवेदनातून करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)