शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

राळेगावात शेतकऱ्यांचा कल खासगी खरेदीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.

ठळक मुद्देखासगी खरेदी ८० हजार क्विंटल : सीसीआयकडे केवळ १२ हजार क्विंटल

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथील मार्केट यार्डवरील खासगी कापूस खरेदीत सद्यस्थितीत चार हजार ७०० ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर शेतकऱ्यांना मिळत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील सीसीआयची खरेदी तालुक्यात राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथे सुरू झाली आहे.खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.राळेगावला दररोज सरासरी पाच-सात हजार, वाढोणात एक हजार क्विंटल कापूस खासगीत खरेदी केला जात आहे. खासगीत खरेदीच्या तुलनेत सीसीआयची खरेदी केवळ १२-१३ टक्के एवढीच आहे. खासगीत कापूस विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे ५०० ते ८०० रुपये नुकसान होत आहे. त्यात नगदी पैसे, आत्ताच पाहिजे या आग्रहामुळे ते स्वत:चे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत असल्याचे मार्केटमध्ये फेरफटका मारला असता चर्चेअंती समजले.बाजार समिती व सीसीआयकडून अपेक्षासीसीआयला कापूस विकू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मार्केट यार्डवर बाजार समितीने वेगळे ठिकाण वाहन व बैलबंड्यांकरिता राखून ठेवण्याची गरज आहे. त्यातच समितीने शेतकऱ्यांचा कापसाचा ओलावा (मॉइश्चर) मोजून तो प्रमाणित प्रतीवर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. सीसीआयनेही १२ टक्के ओलाव्याची अट दरवेळी धरून न ठेवता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता ठेवावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अट थोडीफार शिथील करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्याकरिता आवाज उचलण्याची गरजही व्यक्त होत आहे. मार्केट यार्डात व्यापाºयांच्या गराड्यात सीसीआयला शोधणे कठीण जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड