शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकरी पिता-पुत्राला एकाच चितेवर भडाग्नी

By admin | Updated: August 25, 2016 01:49 IST

कर्जबाजारीपणा आणि आजाराने त्रस्त होवून आत्महत्या केलेल्या शेतकरी पिता-पुत्राला एकाच चितेवर भडाग्नी

समाजमन गहिवरले : शेलू येथे गळफास लावून संपविली जीवनयात्राआर्णी : कर्जबाजारीपणा आणि आजाराने त्रस्त होवून आत्महत्या केलेल्या शेतकरी पिता-पुत्राला एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आली. आर्णी तालुक्यातील शेलू सेंदूरसणी येथे बुधवारी या पिता-पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण गहिवरला होता. काशीराम चंद्रभान मुधळकर आणि त्यांचा मुलगा अनिल काशीराम मुधळकर या दोघांनी एकाच झाडाला दोर बांधून मंगळवारी दुपारी आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. बुधवारी दुपारी शेलू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर पिता-पुत्राचे प्रेत ठेवले तेव्हा अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. काशीरामने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा सुनील नावाचा मुलगा बारावी तर दीपक सातवीत शिकत आहे. मुलगी सुनीता ही नवव्या वर्गात शिकत आहे तर अनिता सहाव्या वर्गात आणि प्रांजली दुसऱ्या वर्गात आहे. पित्याच्या मृत्यूनंतर आपल्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्च कोण करणार, असे म्हणत हा परिवार घायमोकलून रडत आहे. काशीरामने गतवर्षीच घर बांधले होते. मात्र पैशाअभावी घराला खिडक्या-दरवाजे लावणे झालेच नाही. त्यातच शेतीही पिकली नाही. यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे गावातील शेतकरी उमेश राठोड याने सांगितले. तालुक्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब असून शेतकऱ्याने असा विचार करायला नको, असे माजी जिल्हा परिषद सदस्य अनंता गावंडे यांनी सांगितले. शेलू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत गावंडे, विलास राऊत, रवी राठोड, पंचायत समिती सदस्य राजू वीरखेडे, आर्णीचे नगरसेवक छोटू देशमुख, सुनील भारती, नितीन बुटले, स्वप्नील साठे, विलास गरड, तहसीलदार सुधीर पवार आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)