योग्य मोबदल्यासाठी शेतकरी इरेला पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:24 IST2019-05-18T21:21:30+5:302019-05-18T21:24:22+5:30
सरकारी कामासाठी शेतजमीन घेत आहे, पण योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वत्र गंभीर झालेला हा प्रश्न आहे. शिवाय मोबदला देताना दुजाभाव होतो अशीही ओरड आहे. होत असलेला अन्याय अनेक ठिकाणी निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेऊन दूर केला जात नाही. अशावेळी टोकाची भूमिका घेतली जाते.

योग्य मोबदल्यासाठी शेतकरी इरेला पेटला
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : सरकारी कामासाठी शेतजमीन घेत आहे, पण योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वत्र गंभीर झालेला हा प्रश्न आहे. शिवाय मोबदला देताना दुजाभाव होतो अशीही ओरड आहे. होत असलेला अन्याय अनेक ठिकाणी निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेऊन दूर केला जात नाही. अशावेळी टोकाची भूमिका घेतली जाते. असाच प्रकार नेर येथे घडला. शेख भोलू कुरेशी यांच्या शेताचा काही भाग नेर बायपाससाठी संपादित करण्यात आला. याच मार्गावर शेती असलेल्या काही लोकांना वसाहतीचा दर दिला गेला. परंतु काही शेतकऱ्यांना केवळ शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला. त्यांनी राजीनामे देण्यास स्पष्ट नकार दिला. शेख कुरेशी यांनी याहीपुढे जाऊन चक्क शेतातून जाणाºया बायपास मार्गावर घराचे बांधकाम सुरू केले आहे. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतातून बायपास जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. अधिकाºयांना शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
नेर बायपासच्या कामाला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरुवात करण्यात आली. वास्तविक या कामासाठीच्या अनेक प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकºयांनी आपल्या जमिनी दिल्या नाहीत. अशावेळी कामाची घाई का, असा प्रश्न विचारला जात आहे.
पाच वर्षांपासून बायपासच्या कामाचा कांगावा सुरू आहे. विविध कामांसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते. वनविभागानेही परवानगी दिली नसल्याची माहिती एका अधिकाºयाने दिली. सध्या रस्त्याच्या दोनही बाजूला खोदकाम केले जात आहे. परंतु मोबदल्याचा प्रश्न असल्याने काम अडण्याची चिन्हे आहे.