शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कामाच्या शोधात परराज्यातील कुटुंब उमरखेडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 5:00 AM

आकाशात उंच भरारी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपल्या स्वप्नांसाठी जगत असते, तर कोणी ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. मात्र शहरात दाखल झालेली ‘मुस्कान’ केवळ दोन वेळेच्या जेवणासाठी आकाशात उंच भरारी घेत आहे. शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपणे बागडण्याच्या वयात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलून ती दोरीवर कसरतीचे खेळ सादर करीत आहे. त्यातून मिळालेल्या पैशावर कुटुंबाची गुजराण करीत आहे.

ठळक मुद्देपोटाची खळगी : चिमुकलीच्या जीवावर कुटंबाचा भार, दोरीवरील कसरतीतून बालिका करते कुटुंबाची गुजराण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : रोजगाराच्या शोधात परराज्यातील अनेक कुटुंबे शहरासह तालुक्यात दाखल होत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ही कुटुंबे मिळेल ते काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात एका कुटुुंबातील चिमुकलीच्या जीवावर कुटुंबाचा भार आला आहे.आकाशात उंच भरारी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपल्या स्वप्नांसाठी जगत असते, तर कोणी ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. मात्र शहरात दाखल झालेली ‘मुस्कान’ केवळ दोन वेळेच्या जेवणासाठी आकाशात उंच भरारी घेत आहे. शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपणे बागडण्याच्या वयात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलून ती दोरीवर कसरतीचे खेळ सादर करीत आहे. त्यातून मिळालेल्या पैशावर कुटुंबाची गुजराण करीत आहे.आपले बिºहाड घेऊन छत्तीसगड राज्यातील रायपूरमधील एक युवक कुटुंबासह येथे दाखल झाले आहे. ते वितभर पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी भटकत येथे पोहोचले. त्यांची मुलगी ‘मुस्कान’ दोरीवरचे खेळ करून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. अवघ्या ८ वर्षांची मुस्कान दोरीवर चालण्याच्या चित्तथरारक कसरती करीत आहे. स्वत:च्या जीवाची बाजी लावून ती उपस्थितांची करमणूक करते. त्यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा गाडा हाकते. एकप्रकारे ती कुटुंबाचा आधारवड बनली आहे.शाळा शिकण्याच्या वयात ‘मुस्कान’ कुटुंबाची आधारवड बनली. तिला शाळेचा आणि शिक्षणाचा गंध नाही. दुसरीकडे बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी कायदा तयार झाला. हा कायदा मुस्कानपुढे खुजा ठरल्याचे दिसत आहे. समाजात अशा अनेक ‘मुस्कान’ आहे. त्यांची कोणी दखल घेईल काय, हाच खरा प्रश्न आहे.वर आकाश अन् खाली धरतीचा आधाररस्त्याच्याकडेला चार बांबू रोवून २0 फूट लांबीची दोर बांधून सुमारे १0 फूट उंचीच्या दोरीवरून एकावर एक तीन भांडी रचून मुस्कान कधी चपला, तर कधी स्टीलच्या ताटावरून जीवघेण्या कसरती करते. त्यातून आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करते. मुक्कामासाठी वर आकाश अन् खाली केवळ धरती. जुनी दुचाकी, चार-सहा बांबू, दोरी, चार गोधड्या असा फाटका संसार घेऊन हे कुटुंब गावोगावी भटकते. त्यांच्या बिºहाडापर्यंत विकास कसा आणि कधी पोहोचणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ‘मुस्कान’च्या कसरतीच्या खेळावरच आमचे पोट असल्याने शाळेत जाणे हा प्रकार आम्हाला माहितच नाही, असे तिचे वडील ‘अजय’ अगतिकपणे सांगतात. असेच भटकत व कसरतीचे खेळ करीत आम्ही वर्षातून कधीतरी एकदा गावाकडे जातो, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी